AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मांजर आडवी गेल्यानंतर पूर्वीचे लोकं का थांबायचे? अंधश्रद्धा नाही तर हे होते कारण

मांजरीने रस्ता ओलांडल्यावर अपशकुन म्हणून थांबणारे अनेक जण आहेतस पण ही पद्धत सुरू कशी झाली? अत्यंत रंजक अशी माहिती जाणून घेऊया.

मांजर आडवी गेल्यानंतर पूर्वीचे लोकं का थांबायचे? अंधश्रद्धा नाही तर हे होते कारण
मांजर रस्ता ओलांडतानाImage Credit source: Source
| Updated on: Jul 29, 2023 | 10:29 AM
Share

मुंबई : मांजर आडवी गेल्यानंतर बरेच जण काही वेळ थांबतात किंवा मार्ग बदलतात. मांजर आडवी गेल्यानंतर (cat cross path) त्या वाटेने जाऊ नये, अन्यथा काही अनुचित घटना घडते, असा समज आहे. या प्रकरणात, मांजरीच्या रंगाबद्दल देखील वेगवेगळ्या समजुती आहेत. मांजर काळी असेल तर घोर अनर्थ वैगरे होतो असे मानणारेसुद्धा काही कमी नाहीत. तसेच आपआपल्या परीने तर्क वितर्क लावणारेही बरेच आहेत. पुर्वीच्या काळी जुने लोकं या गोष्टी जास्त मानायचे. हल्ली याचे प्रमाण कमी झाले असले तरी ही प्रथा किंवा पद्धत नेमकी कशी सुरू झाली याबद्दलची रंजक माहिती अनेकांना नसावी. यामागे एक वैज्ञानिक कारण दडलेल आहे. हे कारण आता लागू पडत नसले तरी पूर्वीच्या काळी नक्कीच लागू पडायचे.

पूर्वी मांजरच नाही तर कुठलाही प्राणी रस्ता ओलांडत असताना थांबायचे

मांजरीला अशुभ मानण्याचे कोणतेही वैज्ञानिक कारण सिद्ध झालेले नाही. पण काळ्या मांजरीला अशुभ मानणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्याचप्रमाणे, पांढऱ्या मांजरीबद्दल अशुभ आणि अशुभ अशा दोन्ही मान्यता आहेत. प्राण्याने रस्ता ओलांडताना थांबण्याची पद्धत पूर्वी रात्री पाळली जायची.  पूर्वीच्या काळी जेव्हा वीज नव्हती तेव्हा वाटेत कोणताही आवाज आला की लोक थांबायचे, जेणेकरून एखादा जंगली प्राणी रस्ता ओलांडत असेल तर तो आरामात रस्ता ओलांडू शकेल. तो आपल्याला इजा करणार नाही आणि त्याने आपले नुकसान होऊ नये यासाठी हे पाळण्यात यायचे. हळूहळू ही परंपरा काळ्या मांजरीशी जोडली गेली. काळी मांजर अंधारात दिसत नाही अशावेळी मांजर किंवा माणूस दोघांपैकी कोणालाही अपघात होऊ नये म्हणून काळी मांजर पाहून अवश्य थांबायचे.

साथीचे आजार टाळण्यासाठी सुरू झाली पद्धत

मांजर जेव्हा रस्ता ओलांडते तेव्हा थांबण्याशी संबंधित किंवा हा ट्रेंड सुरू होण्यामागे एक खास कारण आहे. खरं तर, अनेक दशकांपूर्वी उंदरांमुळे प्लेगचा आजार पसरला होता आणि या महामारीमुळे हजारो लोकं मृत्यूमुखी पडले होते. कोरोनामध्ये ज्याप्रकारे आपण मृत्यूचं तांडवं अनुभवलं तसाच काहिसा का प्रकार होता.  मांजराचे मुख्य अन्न उंदीर आहे. अशा परिस्थितीत मांजराच्या माध्यमातून हा संसर्ग लोकांमध्ये पसरण्याची शक्यता असल्याने मांजरीपासून अंतर राखण्यास सांगण्यात आले. ज्या ठिकाणाहून मांजर बाहेर पडायचे, तेथे जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने लोकांनी थोडा वेळ त्या ठिकाणी जाणे टाळले. तसेच ज्या दिशेला मांजर गेली त्या दिशेला जाणे लोकं टाळायचे. कालांतराने प्लेग कमी झाला मात्र लोकांमध्ये ही पद्धत मात्र कायम राहिली. जसजसा काळ लोटत गेला या पद्धतीला अंधश्रद्धेची जोड मिळाली.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.