AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्टात साक्ष देताना भगवत गीतेवर हात ठेऊन शपथ का दिली जाते? असा आहे नियम

oath act India ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला साक्षीदारांच्या शपथेसाठी भारतात मुघल काळापासूनच्या परंपरा पुढे नेल्या. मुघलांच्या काळात, दरबारात हिंदूंना निष्ठेची शपथ घ्यायची किंवा हातात गंगाजल घेऊन खरे बोलायचे.

कोर्टात साक्ष देताना भगवत गीतेवर हात ठेऊन शपथ का दिली जाते? असा आहे नियम
प्रतिकात्मक फोटोImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 07, 2023 | 11:45 AM
Share

मुंबई : 70 ते 90 च्या दशकातील कोणताही चित्रपट असो, कोर्टरूमचा सीन असेल तर एक गोष्ट कॉमन होती. ती म्हणजे साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या व्यक्तीला गीता किंवा कुराण कापडात गुंडाळून कोर्टाचा कर्माचारी शपथ घ्यायला सांगतो. मग, साक्षीदार त्यावर हात ठेवून शपथ घेतो की, ‘मी जे काही बोलेन ते मी सत्य सांगेन, सत्याशिवाय काहीही सांगणार नाही.’ न्यायालयांचे हे सिनेमॅटिक चित्र पूर्णपणे काल्पनिक नाही. ब्रिटिशांनी तो कायद्याचा भाग (oath act India) बनवला होता. इंग्रज गेल्यानंतरही धर्मग्रंथांवर हात ठेऊन साक्षीदारांना शपथ देण्याची परंपरा कोर्टात दीर्घकाळ चालू होती.

ब्रिटीशांनी सुरू केली होती पद्धत

ईस्ट इंडिया कंपनीने भारत काबीज केला तेव्हा शासनापासून ते न्यायालयापर्यंत ज्या परंपरा ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये स्वीकारल्या होत्या त्याच होत्या. त्यांच्यासाठी राजा सर्वोच्च होता, राजा कधीत चुकत नाही असे म्हटले जाजचे. इंग्लंडमध्ये जसजसा चर्चचा प्रभाव वाढला, तसतसा त्यांचा राजेशाही सत्ता आणि परंपरांमध्येही ढवळाढवळ वाढत गेली. पूर्वी इंग्लंडमध्ये लोकं राजाच्या नावाने शपथ घेत असत. नंतर त्याची जागा देवाने घेतली आणि बायबलवर हात ठेवून शपथ घेण्यात यायची. भारतातही इंग्रजांनी ही व्यवस्था न्यायालयांमध्ये राबवली.

ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवातीला साक्षीदारांच्या शपथेसाठी भारतात मुघल काळापासूनच्या परंपरा पुढे नेल्या. मुघलांच्या काळात, दरबारात हिंदूंना निष्ठेची शपथ घ्यायची किंवा हातात गंगाजल घेऊन खरे बोलायचे होते. नंतर गंगाजलाची जागा श्रीमद भागवत गीतेने घेतली. तसेच इतर लोकांनीही धर्मग्रंथावर आपापल्या धर्मानुसार शपथ दिली जायची. 1873 मध्ये केलेल्या शपथ कायद्यात काही बदल करून ते चालू ठेवण्यात आले.

धर्मावर आधारित राज्यकारभार आणि न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या भारतीय शासनपद्धतीत पूर्वीही देवाची शपथ घेण्याची प्रथा प्रचलित होती. गौतम संहितेपासून ते विष्णू पुराण आणि मनूच्या ग्रंथांपर्यंत धर्मावर आधारित शपथेचा उल्लेख आहे. ही धर्म-आधारित शपथ प्रणाली विवेकापेक्षा दैवी शक्तीच्या  भीतीवर आधारित होती, ज्यामध्ये असा विश्वास होता की जो धर्म किंवा देवतेच्या नावावर सत्य बोलतो त्याचे मरणोत्तर जीवन चांगले असते. जर त्याने खोटे बोलले तर त्याला नरकात जावे लागते. चाणक्याने राज्यपद्धतीवर आधारित ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथातही देव किंवा धर्माच्या नावाने शपथ घेणे अनिवार्य केले होते. कुराणात असेही म्हटले आहे की, तुमची शपथ मोडू नका कारण तुम्ही देवाला साक्षीदार म्हणून निवडले आहे.

कायदा काय सांगतो?

स्वतंत्र भारतात पहिली दोन दशके धर्मग्रंथांवर हात ठेवून साक्षीदारांनी शपथ घेतली. उदाहरणार्थ, 1957 पर्यंत, मुंबई उच्च न्यायालयाने गैर-हिंदू आणि गैर-मुस्लिमांनी त्यांच्या धार्मिक ग्रंथांच्या नावाने शपथ घेण्याची तरतूद चालू ठेवली. ख्रिश्चनांना ‘न्यू टेस्टामेंट’वर, ज्यूंना ‘हिब्रू टेस्टामेंट’वर आणि पारशींना ‘झेंड-अवेस्ता’वर शपथ घ्यावी लागली. तर हिंदू आणि मुस्लिमांना देवाच्या नावाने शपथ घ्यावी लागायची.

शपथ कायदा 1969 मध्ये आणखी एक महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा आधारही परंपरेशी जोडण्यात आला आहे. कायद्यानुसार, 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला साक्ष देण्यासाठी शपथ घेण्याची आवश्यकता नाही. त्याची साक्ष थेट मान्य आहे. मुले ही देवाचे रूप आहेत आणि ते खोटे बोलत नाहीत, ही त्यामागची कल्पना आहे. मात्र, शपथेवर खोटे बोलणे किंवा खोटे पुरावे सादर करणे यासाठी शिक्षेचीही तरतूद आहे. यामध्ये शपथपत्रात चुकीची माहिती देणे देखील गुन्हा आहे कारण शपथ कायदा स्पष्टपणे सांगतो की एखादी व्यक्ती शपथेवर जे काही बोलते, त्याला तो स्वतः जबाबदार असतो.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.