AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोरखपूरच्या गीता प्रेसचा शताब्दी समारोप, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिली भेट, 10 रुपये भाड्याच्या दुकानात झाली होती सुरुवात

गीता प्रेस हे साल 1923 पासून हिंदू धार्मिक ग्रंथांचे जगातील सगळ्यात मोठे प्रकाशन बनले आहे. बदलल्या काळानूसार येथील छपाईने देखील आपले तंत्र काळानुरुप बदलले आहे. आज लाखो लोकांना यामुळे रोजगार मिळाला आहे.

गोरखपूरच्या गीता प्रेसचा शताब्दी समारोप, पंतप्रधान नरेंद्र मोदी दिली भेट, 10 रुपये भाड्याच्या दुकानात झाली होती सुरुवात
geeta pressImage Credit source: socialmedia
| Updated on: Jul 07, 2023 | 4:31 PM
Share

नवी दिल्ली : आपण आजवर रस्त्याच्या कडेला किंवा रेल्वे स्थानकाच्या शेजारी एखाद्या स्टॉलवर किंवा हातगाडीवर भगवत गीता विकणाऱ्यांना पाहीले असेल. या भगवान श्रीकृष्णाने अर्जूनाला दिलेला हा संदेशाचं हे पुस्तक चाळताना आपली नजर गीता प्रेस गोरखपूर हा पत्ता नक्कीच पाहीला असेल. महागाईच्या जमान्यात इतक्या स्वस्तात कशी काय ही धार्मिक पुस्तकं मिळत असतील ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर या मागे आहे मागील शंभर वर्षांची परंपरा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी गोरखपूरच्या गीता प्रेसला भेट देणार आहेत. गीता प्रेसचं यंदाच्या शताब्दी वर्षाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मोदी सहभाग घेत आहेत. गीता प्रेसला अलीकडेच महात्मा गांधी शांतता पुरस्कार देण्याची घोषणा केली होती, त्यावेळी वाद निर्माण झाला होता. गीता प्रेसची स्थापना साल 1923 मध्ये जयदयाल गोयंदका आणि हनुमान प्रसाद पोद्दार यांनी केली होती. हिंदु धार्मिक पुस्तकांची छपाई अत्यंत कमी खर्चात करून ती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य ही गीता प्रेस करीत आली आहे.

शंभर वर्षात 42 कोटी पुस्तकांची छपाई

गीता प्रेसच्या शताब्दी वर्षाचा समारोप यंदा होत आहे. भगवतगीता, तुलसीदासाच्या रचना, पुराणे आणि उपनिषदे असे पौराणिक वाय:मय गीता प्रेसने अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध केले आहे. शंभर वर्षात गीता प्रेसने 42 कोटी पुस्तके छापली आहेत. यात भगवतगीतेच्या 18 कोटी प्रतींचा समावेश आहे. येथे जर्मन आणि जपानी हायटेक मशिन्सवर रोज सोळा भाषेत 1800 पुस्तकांच्या 70 हजार प्रती छापल्या जात आहेत. येथे दोन रुपयात हनुमान चालीसा मिळते.  शंभर विविध प्रकारच्या गीतेच्या 12 कोटी प्रतींची छपाई येथे झाली आहे.

भांडणातून झाली सुरुवात

गोयंदका यांनी स्वस्तात जनतेला भगवत् गीता पुरविण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे त्यांनी आधी 1922 मध्ये कलकत्ता येथील वाणिक प्रेसला काम सोपविले होते. परंतू त्यांच्याकडून पुस्तकाच्या छपाईत काही त्रुटी राहील्याने त्यांनी संबंधित छपाईबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावेळी या वाणिक प्रेसने त्यांना मग तुम्हीच छपाई करा असे रागाने सांगितले. त्यानंतर गोरखपूरच्या घनश्यामदास जालान यांची मदत यासाठी घेतली. अशाप्रकारे गोरखपूरला गीताप्रेसची सुरुवात झाली. यासाठी अमेरिकेच्या बोस्टन येथून दहा हजारात छपाईची मशिन मागविण्यात आली. त्यानंतर 1926 मध्ये हा छापखाना दुसरीकडे हलविण्यात आला. त्यानंतर आजतागायत ही गीताप्रेस याच जागेत काम करीत आहे.

10 रुपये भाड्याच्या दुकानातून प्रारंभ

या गीता प्रेस प्रकाशनाची सुरुवात एका भाड्याच्या दुकानात झाली होती. आज हे एक मिशन बनले आहे. राजस्थानात राहणारे जयदयाल गोयंदका यांचे घराण्यात व्यवसाय करणारे होते. त्यांनी 29 एप्रिल 1929 रोजी गोरखपुरच्या हिंदी बाजारात 10 रुपये भाड्याच्या दुकानात या प्रेसची मुहुर्तमेढ रोवली तिचा आज वटवृक्ष झाला आहे. या प्रेसमध्ये गीतेची छपाई होत होती म्हणून ती गीता प्रेस नावानेच नावारुपाला आल्याचे सांगितले जाते. आज 80 लाख रुपये केवळ कर्मचाऱ्याच्या वेतनावर खर्च केले जात आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.