हिंदू धर्मात पुजेच्या वेळी लाल धागा का बांधल्या जातो? अत्यंत प्रभावी आहेत लाल धाग्याचे हे उपाय

नितीश गाडगे,  Tv9 मराठी

|

Updated on: Mar 18, 2023 | 5:35 PM

पूजेच्या वेळी हातात लाल धागा बांधण्याची प्रथा आहे आणि ते खूप शुभ मानले जाते पण तुम्हाला माहित आहे का की हा लाल धागा तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकतो?

हिंदू धर्मात पुजेच्या वेळी लाल धागा का बांधल्या जातो? अत्यंत प्रभावी आहेत लाल धाग्याचे हे उपाय

मुंबई : हिंदू धर्मात जेव्हा एखाद्याकडे कोणतीही पूजा,  प्राणप्रतिष्ठा, हवन किंवा व्रतवैकल्य असते तेव्हा लाल धाग्याचा विशेष वापर केला जातो. अनेकदा देवाला वस्त्राच्या रूपात लाल धागा (Lal Dhaga Upay) अर्पण केला जातो. याशिवाय पूजेच्या वेळी हातात लाल धागा बांधण्याची प्रथा आहे आणि ते खूप शुभ मानले जाते पण तुम्हाला माहित आहे का की हा लाल धागा तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकतो? होय, आज आम्ही तुम्हाला लाल धाग्याचे काही अप्रतिम उपाय सांगत आहोत, जे तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यात मदत करतील.

लाल धाग्याचे प्रभावी उपाय

एक छोटा लाल धागा घेऊन त्यावर श्रीगणेशाच्या पायाचे कुंकू लावा. यानंतर काही वेळ हा धागा गणेशाच्या चरणी ठेवावा.  गणेशाच्या मूर्तीसमोर बसून ‘ओम श्री गणेशाय नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर गणेशजींची आरती करून लाल धागा उचलून ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा उच्चार करताना धाग्यात सात गाठी बांधा. मग ही तो तुमच्या गळ्यात घाला. जर ते गळ्यात घालणे शक्य नसेल तर तुम्ही पर्समध्ये देखील ठेवू शकता. या उपायाचा अवलंब केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात कधीही धनाची कमतरता भासणार नाही.

लाल धाग्याचे नियम

पूजेत वापरला जाणारा लाल धागा बांधण्याचेही काही नियम आहेत. ज्याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

हे सुद्धा वाचा

हातावर धागा बांधताना हात कधीही रिकामा नसावा.  काही पैसे किंवा फुलं मुठीत ठेवावीत.

धागा हातात फक्त तीन वेळा गुंडाळावा. असे म्हणतात की धाग्याला तीन वेळा गुंडाळले म्हणजे तुम्ही तीन पिढ्या चालेल इतके धन कमवाल.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI