AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यमुना नदीचे पाणी घरात ठेवणे का मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय आहे कारण

गंगा नदीप्रमाणेच भारतात अनेक पवित्र नद्या आहेत त्यांची पूजा केली जाते आणि त्यांचे पाणी पवित्र मानले जाते. तसेच ते घरात देखील ठेवले जाते. यमुना ही देखील या नद्यांपैकीच एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की यमुना नदीचे पाणी गंगेच्या पाण्याप्रमाणे घरात का ठेवले जात नाही? जाणून घेऊ काय आहे यामागचे कारण.

यमुना नदीचे पाणी घरात ठेवणे का मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय आहे कारण
yamuna riverImage Credit source: Tv9 Bharatvarsh
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Feb 02, 2025 | 3:25 PM
Share

गंगा ही भारतातील सर्वात पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. ती केवळ नदी मानली जात नाही तर तिची पूजाही केली जाते. गंगेचे पाणी शिंपडल्यानेच एखादी जागा किंवा व्यक्ती पवित्र होते अशी धार्मिक धारण आहे. त्यामुळेच गंगेचे पाणी वेगवेगळ्या घाटावरून आणून घरात ठेवले जाते. गंगेचे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिसळून आंघोळ केली जाते. तसेच पूजा किंवा यज्ञ करताना काही थेंब गंगेच्या पाण्याचे घरात शिंपडले जातात. पण काही लोक यमुनेचे पाणी घरात ठेवतात. यमुना नदीच्या काठावर पूजा करतात आणि त्याचे पाणी घरी आणतात. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न येतो की यमुना नदीचे पाणी गंगा नदीच्या पाण्यासारखे पवित्र आहे का? आणि ते गंगेच्या पाण्याप्रमाणे घरात ठेवता येऊ शकतो का?

यमुना नदी बद्दलची मान्यता

भारतातील अनेक नद्या अतिशय पवित्र मानल्या जातात. त्यापैकी गंगा, यमुना नदीचे देखील नाव आहे. यमुना नदी पश्चिम हिमालयातून उगम पावते. तसेच ही नदी उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर वाहते. यमुना नदी दिल्ली, आग्रा आणि प्रयागराज मधून जाते. प्रयागराज मध्ये यमुना नदी गंगा नदीला मिळते.

प्रयागराज मध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम होतो आणि त्याला त्रिवेणी संगम असे म्हणतात. गंगा नदीप्रमाणेच यमुना नदीची ही पूजा केली जाते आणि गंगा आरतीप्रमाणे यमुना नदीची आरती अनेक घाटांवर केली जाते. असे मानले जाते की यामुळे पवित्रता येते आणि अनेक पापे नष्ट होतात.

शास्त्रामध्ये काय आहे यमुना नदीचे स्थान

धार्मिक शास्त्रानुसार यमुना नदीचे पाणी घरी आणणे अशुभ मानले जाते. याचे कारण म्हणजे यमुना नदी श्रीकृष्णाची पटरानी मानल्या जाते. पौराणिक कथेनुसार यमुना नदीला श्रीकृष्णाकडून वरदान मिळाले होते कि ती सदैव त्यांच्या चरणी राहील. त्यामुळे यमुना नदीचे पाणी घरात ठेवणे निषिद्ध मानले जाते.

यमुना नदीमध्ये यमाचा वास आहे

धार्मिक श्रद्धेनुसार यमुना नदी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या चरण कमलांच्या निवासाशिवाय कुठेही थांबत नाही. याशिवाय यमुनेचे पाणी घरात न ठेवण्यामागचे आणखीन एक मोठे कारण म्हणजे यमराज यमुना नदीत वास करतात असे मानले जाते. शास्त्रानुसार यमराज हे यमुना नदीचा भाऊ आहे. असे मानले जाते की यमुनेचे पाणी घरात ठेवणे म्हणजे यमाला घरात स्थान देण्यासारखे आहे. यमराज यमुना नदीचे भाऊ असल्याकारणाने यमुना नदीमध्ये स्नान केल्याने यमराज त्या व्यक्तीला त्रास देत नाही.

यमुना नदीचे पाणी घरात न ठेवण्याचे इतर कारणे

  • यमुना नदीत प्रदूषणाची समस्या आहे.
  • घरगुती, औद्योगिक कचरा आणि शेतीचा कचरा यमुना नदीमध्ये आढळतो.
  • यमुना नदीचे पाणी पिऊन लोक आजारी पडू शकता.
  • यमुना नदीत स्नान करणे देखील सुरक्षित मानले जात नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!
पुण्यात धो धो धो...मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; सगळीकडे बरसल्या सरी!.
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा...
petrol shortage | थेट कोयता, तलवार घेऊन... पेट्रेल पंपावर मोठा राडा....
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग...
राज्यात SIR कसे राबवले जाणार, कोणती कागदपत्रे द्यायची? निवडणूक आयोग....
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी..
कॉकरोच जनता पार्टीच्या अध्यक्षाला जीवे मारण्याची धमकी, देशभरात मोठी...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल...
ती मोठी चूक झाली, ठाकरेंच्या जाहीर विधानाची चर्चा; त्या नेत्याबद्दल....
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी...
119 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी CBI ची धडक कारवाई, या 7 ठिकाणी....
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला...
राजकारणात खळबळ! महायुतीत शीतयुद्ध सुरू? बडा नेता थेट म्हणाला....
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी...
निवडणुकीची तारीख जाहीर, मात्र सुनेत्रा पवारांच्या जागी कुणाची वर्णी....
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर...
मनोज जरांगे-प्रसाद लाड यांच्यातील चर्चा LIVE, जरांगेंचं थेट उत्तर....
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर
एकच खळबळ! पेपरफुटी झालीच नाही, परीक्षा रद्द करण्याचं कारण...NEET पेपर.