Lord Vishnu | वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा, ‘या’ मंत्राचा जप करा

| Updated on: May 13, 2021 | 10:13 AM

हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस अतिशय खास मानला जातो (Worship Lord Vishnu). मान्यता आहे की भगवान विष्णूची मनोभावे उपासना करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा भगवान पूर्ण करतात.

Lord Vishnu | वैवाहिक जीवनात आनंद हवा असेल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा, या मंत्राचा जप करा
lord vishnu
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवारचा दिवस अतिशय खास मानला जातो (Worship Lord Vishnu). मान्यता आहे की भगवान विष्णूची मनोभावे उपासना करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा भगवान पूर्ण करतात. हिंदू धर्मग्रंथानुसार, गुरुवारी भगवान नारायणाची विधीवत पूजा केल्यास जीवनातील सर्व समस्या दूर होतात (Worship Lord Vishnu On Thursday For Happy Married Life).

भगवान विष्णूला जगाचे पालनहार म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार, गुरुवारी भगवान विष्णूची विधावत पूजा केल्यास सर्व संकट दूर होतात. पौराणिक मान्यतांनुसार, गुरुवारी उपवास केल्याने आणि कथा ऐकल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आर्थिक समस्या सुटतात, बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढते, ग्रह दोष दूर होतात. गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि त्यांना गुळ आणि चन्याचा नैवेद्य दाखवलं जाते. आनंदी वैवाहिक जीवनासाठी भगवान विष्णूची उपासना कशी करावी हे जाणून घेऊया –

बृहस्पतिदेवाच्या पूजेचे महत्त्व

हिंदू मान्यतेनुसार, बृहस्पति हा केवळ एक ग्रह नाही तर जीवनातील विविध पैलूंवर प्रभाव पाडणारा देवता आहे. विधीवत बृहस्पती देवताची उपासना केल्याने इच्छित जीवनसाथी मिळतो. वैवाहिक संबंध यशस्वी होतात आणि करिअरमध्येही यश प्राप्त होते. ज्यांचा बृहस्पति अशक्त आहे, त्यांना ही पूजा फळ देते. आई-वडिलांशी चांगल्या नात्यासाठी या दिवशीच्या पूजेची मान्यता आहे.

पूजेची पद्धत काय?

गुरुवारच्या दिवशी बृहस्पति देव आणि भगवान नारायणाची या मंत्राने करावी – “ओम नमो नारायणा…” हा मंत्रजप 108 वेळा केल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते आणि करियरमध्येही यश मिळते. पूजेमध्ये दूध, दही आणि तूप यांच्यापासून बनलेल्या पिवळ्या पदार्थांचं नैवेद्य दाखवा. जर आपण भगवान विष्णूची उपासना करत असाल तर दिवसातून एकदा उपवासाचं पारण करावं आणि फक्त गोड पदार्थांचे सेवन करावं.

या गोष्टी लक्षात ठेवा –

– गुरुवारी पूजा करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळते.

– गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा महत्त्वपूर्ण आहे, कारण ते भगवान विष्णूचे अवतार मानले जाते.

– या दिवशी पिवळ्या कपड्यांमध्ये पूजा करावी आणि पिवळ्या वस्तू दान कराव्या. या दानाचं शंभर पट अधिक पुण्य मिळते.

– बृहस्पती ग्रह बळकट करण्यासाठी, पूजेवेळी बृहस्पतिच्या कथेचं पठण करा आणि इतरांना सांगा

– भगवान विष्णूंच्या अवतारांनाही गुळासोबत भिजवलेल्या चणा डाळीचं नैवेद्य दाखवतात

– शिवलिंगावर पिवळी कानेर अर्पण केल्यास शिव आराधनेने गुरुदोष नष्ट होतो.

Worship Lord Vishnu On Thursday For Happy Married Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | या 10 घरांमध्ये भोजन केल्यास आपणही होतो पापाचे भागीदार, जाणून घ्या गरुड पुराण काय सांगते

Kalki Avtar | कोरोना काळात भगवान विष्णूच्या कल्की अवताराची चर्चा का?