तुमचा जीवनसाथी धोका देतोय की तुमच्यासोबत प्रामाणिक आहे? या 3 गोष्टीतून करा चेक
तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खरच प्रामाणिक आहे का? की तो तुम्हाला धोका देतोय? असा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? चला तर मग या प्रश्नांच उत्तर जाणून घेऊयात.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी अर्थशास्त्र आणि कुटनीतीबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचं पुस्तक लिहिलं, या पुस्तकात त्यांनी कुटनीती संदर्भात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आज देखील अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात.
तसेच चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ देखील होते, पैशांचं व्यवस्थापन कसं करावं? आणि भविष्यात तसेच आपल्या वाईट काळासाठी पैसे कसे बचत करून ठेवावेत? मदत कोणाला करावी? कोणाला करू नये? याबाबत देखील चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये विस्तृत माहिती दिली आहे.
चाणक्य यांनी केवळ कुटनीती आणि अर्थ या दोन विषयावर भाष्य केलेलं नाही तर त्यांनी मानवी नातेसंबंधांबाबत देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तुम्ही कोणाला आपला मित्र माणू शकता? कोण तुमचा शत्रू आहे? कोणावर डोळे झाकून विश्वास करावा? कोणावर कधीच विश्वास ठेवू नये? याबाबत देखील चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. दरम्यान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या द्वारे तुम्ही तुमचा पाटर्नर तुमच्यासोबत खरचं प्रामाणिक आहे का? याबाबत खात्री करू शकता. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं?
सुखात तुमच्यासोबत असेल, पण दु:खात सोबत असणार नाही – चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला एखादा व्यक्ती धोका देत असेल तर असा माणूस सुखात नेहमी तुमच्यासोबत असतो. मात्र जेव्हा तुमच्यावर आणीबाणीचा प्रसंग येतो, तेव्हा सर्वात आधी हाच माणूस तुमच्यापासून दूर जातो.
दोघांमधील गोष्टी तिसऱ्याला सांगतो – चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात, ज्या दोघांमध्येच ठेवणे योग्य असते, पण तुमचा जोडीदार अशा गोष्टी जर तिसऱ्याला सांगत असेल तर समजून जा, तो तुमच्यासोबत प्रामाणिक नाहीये.
तुमची मजाक उडवतो – चाणक्य म्हणतात जो व्यक्ती तुम्ही समोर असताना तुमच्याशी चांगलं बोलतो आणि तुमच्या पाठीमागे तुमची मजाक उडवतो, तो व्यक्ती तुमचा कधीच चांगला जोडीदार होऊ शकत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
