ड्रग-फ्री आयव्हीएफ; मूल होण्यासाठी प्रयन्त करणाऱ्या महिलांसाठी आशेचा एक नवीन किरण

IVF मुळे मोठी वैद्यकीय क्रांती घडली आहे. CAPA IVM किंवा ड्रग-फ्री IVF गर्भधारणा कारणासाठी प्रयत्न असलेल्या महिलांसाठी अधिक सोयीस्कर, कमी तणावपूर्ण, किफायतशीर उपचार प्रदान करते.

ड्रग-फ्री आयव्हीएफ; मूल होण्यासाठी प्रयन्त करणाऱ्या महिलांसाठी आशेचा एक नवीन किरण
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:47 AM

मुंबई : भारतातील अनेक स्त्री व पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या पाहायला मिळते. हल्लीच्या काळामध्ये ही समस्या जोर धरत आहे यामागे जीवनशैली व आहार पद्धती तसेच तणावग्रस्त दिनक्रम कारणीभूत असण्याची शक्यता आहे. IVF ही गेल्या ४५ वर्षांतील सर्वात मोठी वैद्यकीय क्रांती आहे, ज्यामुळे जगभरात लाखो बाळांना जन्म देणे शक्य झाले आहे. दुर्दैवाने, अनेक स्त्रिया त्याच्याशी संबंधित शारीरिक, भावनिक आणि आर्थिक समस्यामुळे IVF उपचार सोडून देतात. CAPA IVM किंवा ड्रग-फ्री IVF गर्भधारणा कारणासाठी प्रयत्न असलेल्या महिलांसाठी अधिक सोयीस्कर, कमी तणावपूर्ण, किफायतशीर उपचार प्रदान करते. CAPA IVM (कॅपॅसिटेशन इन विट्रो मॅच्युरेशन/ बाय-फॅसिक IVM) एक प्रगत प्रजनन उपचार आहे ज्यामध्ये फक्त काही इंजेक्शन्सचा समावेश आहे, ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन सिंड्रोम सारखे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ते किफायतशीर देखील आहे.

ओएसिस फर्टिलिटी हे जगातील काही मोजक्या सेन्टरपैकी एक आहे जे महिलांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न अधिक किफायतशीर, सुरक्षित आणि त्रासमुक्त रीतीने साध्य करण्यासाठी हे अद्वितीय तंत्र ऑफर करते. CAPA IVM हा कमी कालावधीचा प्रोटोकॉल आहे, चांगले परिणाम देते आणि PCOS असलेल्या महिलांसाठी अधिक शिफारस केली जाते, ज्या महिलांना हार्मोनल इंजेक्शन्सचा सल्ला दिला जातो किंवा ज्यांना रेझिस्टंट अंडाशय सिंड्रोम, थ्रोम्बोफिलिया, oocyte (स्त्री बीज) परिपक्वता समस्या, आणि हार्मोन-संवेदनशील कर्करोग सारख्या आजाराचा सामना असतात. ओएसिस फर्टिलिटी ज्ञान आणि तंत्रज्ञानावर चालणारी संस्था असल्याने, ओएसिस फर्टिलिटी ने हे नवीन तंत्रज्ञान अविरत संशोधन, जागतिक तज्ञांच्या अंतर्गत- विशेष प्रशिक्षण आणि सेवा उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेद्वारे स्वीकारले आहे.

IVM – महिलासाठी -अनुकूल प्रगत प्रजनन उपचार

IVM (इन विट्रो मॅच्युरेशन) विशेषत: अशा स्त्रियांसाठी आहे ज्यांना हार्मोनल इंजेक्शन्समुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. या पद्धतीमध्ये, स्त्रीबीज अपरिपक्व असताना काही इंजेक्शन्सने अंडाशयातून गोळा केली जातात आणि नंतर प्रयोगशाळेत परिपक्व केली जातात. परिपक्व झाल्यानंतर, स्त्रीबीज(अंडी) फलित केली जातात. ही एक अधिक सुरक्षित प्रक्रिया आहे आणि ओएसिस फर्टिलिटी हे देशातील काही मोजक्या सेन्टरपैकी एक आहे ज्यांना IVM मध्ये आवश्यक कौशल्य आणि अनुभव आहे.

पीजीटी आणि ईरा( ERA) – वारंवार गर्भपात झालेल्या महिलांसाठी वरदान

गर्भपात शारीरिक आणि भावनिक दोन्ही प्रकारे खूप वेदनादायक आहे. काही स्त्रियांना अनेक गर्भपात होतात आणि गर्भपाताचे कारण निदान होत नसल्याने पालकत्व मिळविण्याची आशा गमावतात. गर्भातील अनुवांशिक विकृती हे गर्भपाताचे कारण असू शकते. ज्या स्त्रिया भूतकाळात अनेक गर्भपातांना सामोरे गेले आहेत त्यांनी प्रजनन तज्ञाशी सल्लामसलत करून IVF हे उपचार घेऊ शकतात अशा परिस्थितीत, IVF प्रक्रियेदरम्यान तयार झालेल्या गर्भाना PGT (प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग) द्वारे कोणत्याही अनुवांशिक विकृतीची उपस्थिती आहे का हे तपासली जाऊ शकते. गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात सोडण्यापूर्वी गर्भातील अनुवांशिक विकृती शोधण्याचे तंत्र आहे जे गर्भाच्या पुढील वाढी व विकासासाठी उपयुक्त ठरते. तसेच, अनुवांशिक विकारांचा कोणताही कौटुंबिक इतिहास असलेल्या स्त्रिया पीजीटी वापरू शकतात आणि त्यांच्या संततीला अनुवांशिक विकारांचा वारसा मिळण्याचा धोका दूर करू शकतात.

Oasis Fertility

पीजीटी कशी मदत करते?

• गर्भातील अनुवांशिक विकृती शोधते • चांगले भ्रूण निवडण्यास मदत करते • पालकांकडून मुलामध्ये अनुवांशिक विकारांचे संक्रमण रोखण्यात मदत होते • गर्भधारणेसाठी लागणार वेळ आणि गर्भपात होण्याचा धोका कमी करते ईआरए (एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अॅरे ) ईआरए(ERA) हे आणखी एक महत्त्वाचे तंत्र आहे जे आईव्हीएफ प्रक्रियेत स्त्रीच्या गर्भाशयात गर्भ रोपण करण्यासाठी सर्वोत्तम वेळ शोधण्यात मदत करते. आईव्हीएफ च्या यशाचा दर सुधारला जाऊ शकतो कारण ईआरए गर्भाशयाच्या एंडोमेट्रियमच्या जनुकांची तपासणी करून इम्प्लांटेशनच्या कालावधीचा अंदाज लावतो (ज्या काळात गर्भाशय गर्भधारणेसाठी सर्वात जास्त ग्रहणक्षम असतो).

स्त्री बीज व शुक्रजंतु संवर्धन (फ्रिझींग) – कर्करोगाने पीडिताना देखील पालकत्वाचे वचन.

अनियमित जीवनशैली, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव आणि इतर अनेक कारणांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. कर्करोग आणि केमोथेरपी आणि रेडिएशन सारख्या उपचारांचा देखील प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. इथेच फर्टिलिटी प्रिझर्व्हेशन कर्करोगाने पीडिताना कर्करोगाच्या उपचारापूर्वी त्यांची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास मदत करू शकते. पीडितांची अंडी/भ्रूण/शुक्राणू/अंडाशयाच्या ऊतींना व्हिट्रिफिकेशन नावाच्या तंत्राद्वारे संरक्षित केले जाऊ शकते जे त्यांना दात्याची अंडी/ शुक्राणू किंवा सरोगसीसाठी जाण्याऐवजी त्यांची जैविक मुले जन्माला घालण्यास सक्षम करते.

सोशल फ्रीझिंग – पालकत्व विलंबनासाठी एक सुरक्षित साधन (आवश्यक असल्यास)

शिक्षण आणि करिअरवर लक्ष केंद्रित करणाऱ्या अनेक स्त्रिया येणारे पालकत्व पुढे ढकलतात. परंतु स्त्रीचे जैविक क्रिया कोणीही थांबवू शकत नाही तिच्या वयानुसार प्रजनन क्षमता कमी होत असते. स्त्रिया ठराविक संख्येने अंडी घेऊन जन्माला येतात जी प्रत्येक मासिक पाळीत कमी कमी होत जातात. स्त्रीची ३० वर्षे पूर्ण होईपर्यंत गर्भधारणेची क्षमता कमी झालेली असते. ज्या स्त्रिया काही कारणांनी पालकत्वास उशीर करू इच्छितात त्या त्यांची अंडी/ओव्हेरियन टिश्यू गोठवून प्रजनन क्षमता टिकवून ठेवू शकतात ज्यामुळे त्यांना नंतर त्यांच्या सोयीनुसार वरील तंत्रज्ञानामुळे येणारे मातृत्व स्वीकारता येते. अण्ड्रोलाईफ क्लिनिक्स – पुरुषांसाठीही समान जागा

(AndroLife clinic)अण्ड्रोलाईफ क्लिनिक हे पुरुष वंध्यत्वावर उपचार देणारे विशेष क्लिनिक आहेत जे पुरुष प्रजनन उपचारांसाठी जागा, गोपनीयता प्रदान करतात. जरी 50% वंध्यत्व पुरुष घटकामुळे होते, परंतु बहुतेक पुरुष प्रजनन मूल्यांकनास नकार देतात आणि विलंब करतात. AndroLife हा पुरुषांना त्यांच्या प्रजनन क्षमतेच्या मुद्द्यांवर अॅन्ड्रोलॉजिस्टशी खुलेपणाने चर्चा करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि प्रगत पुरुष प्रजनन उपचारांसाठी प्रोत्साहित करण्याचा एक अनोखा उपक्रम आहे ज्यामुळे पितृत्व प्राप्त होऊ शकते. प्रजनन क्षमता सल्लामसलत आणि उपचारांना उशीर केल्याने गर्भधारणेवर हानिकारक परिणाम होऊ शकतात.

मायक्रोफ्लुइडिक्स, MACS (मॅग्नेटिक ऍक्टिव्हेटेड सेल सॉर्टिंग), टीईएसए (टेस्टीक्युलर स्पर्म एस्पिरेशन), आणि मायक्रो-टीईएसई (मायक्रोसर्जिकल टेस्टिक्युलर स्पर्म एक्स्ट्रॅक्शन) या प्रगत प्रक्रिया आहेत ज्या शुक्राणू निवडण्यात आणि पुनर्प्राप्त करण्यात मदत करतात. ओएसिस फर्टिलिटीला मायक्रो-टीईएसईमध्ये कौशल्य आहे जे शून्य शुक्राणूंची संख्या असलेल्या पुरुषांमध्ये वापरले जाते. हा प्रोटोकॉल देशातील फार कमी केंद्रांद्वारेच दिला जातो

इलेक्ट्रॉनिक विटनेसिंग सिस्टीम – स्वत:च्या मुलांना आलिंगन देण्याचा आनंद

IVF वेळी कोणत्याही नमुना विसंगती मुळे पालकांच्या आनंदाचा ऱ्हास होऊ शकतो. हे समजून घेऊन, ओएसिस फर्टिलिटी एक प्रगत ट्रॅक आणि ट्रेस प्रणाली वापरते जी IVF प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्याची ओळख, निरीक्षण आणि रेकॉर्ड करते. या तंत्रज्ञानाद्वारे, त्रुटी आणि विसंगतींचा धोका टाळला जातो ज्यामुळे स्त्री/जोडप्यांना त्यांचे जैविक मूल होऊ शकते.

आर्टिस (ARTis)- आरोग्य नोंदींचे सुलभ, सोयीस्कर आणि सुरक्षित व्यवस्थापन

ARTis (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टीम) हे ओएसिसचे क्लाउड-आधारित सॉफ्टवेअर आहे जे रुग्णांच्या नोंदी ठेवते आणि कोणत्याही वेळी कुठेही अहवाल सहज उपलब्ध करून देते. तपासणी, स्कॅन, प्रक्रिया, अहवाल इत्यादींसह सर्व उपचार प्रक्रिया ARTis मध्ये दस्तऐवजीकरण केल्या जातात ज्यामुळे रुग्णाला उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर स्पष्ट अंतर्दृष्टी मिळण्यास मदत होते, ज्यामुळे पारदर्शकता राखली जाते.

समग्र आणि वैयक्तिक वंध्यत्व उपचार @ ओएसिस फर्टिलिटी.

प्रत्येक स्त्रीसाठी, उपचार प्रोटोकॉल बदलतो. प्रजनन तज्ञ स्त्रीचे वय, आरोग्य स्थिती, वैद्यकीय इतिहास, जीवनशैली, जोखीम घटक इत्यादींच्या आधारे उपचार मोड्यूलवर निर्णय घेतात. ओएसिस फर्टिलिटीमध्ये आहारातील बदल, जीवनशैलीत बदल आणि महिलांना मातृत्व प्राप्त करण्यात मदत करण्यासाठी सानुकूलित उपचारांसह सर्वांगीण दृष्टिकोनाचा अवलंब केला जातो.

जागरूकता निर्माण करण्यासाठी ओएसिसचे उपक्रम

ओएसिस फर्टिलिटी टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये प्रजनन शिबिरे आयोजित करून वंध्यत्व आणि प्रगत प्रजनन उपचारांबद्दल जागरूकता निर्माण करते. तसेच, ओएसिस फर्टिलिटी मधील प्रजनन तज्ञ जोडप्यांना वेबिनार, टॉक शो, फेसबुक लाइव्ह इत्यादींद्वारे प्रजनन उपचारांवर चर्चा करण्यासाठी प्रोत्साहित करतात. ओएसिस फर्टिलिटीचा मुख्य बोधवाक्य टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये पंख पसरवणे हे आहे ज्यामुळे या भागातील लोकांसाठी प्रजनन उपचार सुलभ आणि परवडणारे बनतील.

“गेल्या ४५ वर्षांत जोडप्यांसाठी सुरक्षितता आणि सुधारित परिणामांच्या बाबतीत आम्ही IVF उद्योगात मोठे टप्पे गाठले आहेत. नैतिकता आणि पारदर्शकता ही आमची मुख्य तत्त्वे आहेत आणि आम्ही नेहमी IVF प्रवासादरम्यान रुग्णाचा अनुभव सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अनेक प्रगत तंत्रज्ञान. जोडप्यांना त्यांच्या जैविक मुलांना स्वीकारण्याचा आनंद भेट देणे हीच आमची इच्छा आहे. जीवनशैलीतील बदल हे स्त्रियांमध्ये वंध्यत्व वाढण्याचे प्रमुख कारण बनले आहे. स्त्रियांसाठी कलंक तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण योग्य वेळी प्रजनन उपचार हस्तक्षेप करते “असे ओएसिस फर्टिलिटीच्या सह-संस्थापक आणि वैद्यकीय संचालक, डॉ. दुर्गा जी राव म्हणतात.

“लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, अल्कोहोलचे सेवन, विलंबित पालकत्व इत्यादींसारख्या अनेक कारणांमुळे भारतात पुरुष वंध्यत्व वाढत आहे. मायक्रोफ्लुइडिक्स हे एक प्रगत तंत्र आहे जे IVF प्रक्रियेसाठी शुक्राणू निवडण्यात मदत करते ज्यामुळे यशाचा दर वाढला आहे. शुक्राणूंची संख्या खूपच कमी असलेले पुरुष मायक्रोटीईएसई सारख्या प्रगत शुक्राणू पुनर्प्राप्ती तंत्रामुळे पिता बनू शकतात. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पुरुषांनी झोपेतून उठून त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर उघडपणे चर्चा करणे आवश्यक आहे. आम्ही बायोलॉजिकल क्लॉक महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्येही थांबवू शकत नाही. ; त्यामुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे महत्त्वाचे आहे,” असे ओएसिस फर्टिलिटीचे सायंटिफिक हेड आणि क्लिनिकल भ्रूणशास्त्रज्ञ डॉ. कृष्णा चैतन्य म्हणतात.

Dr. Nilesh Unmesh Balkawade MBBS, MS, DNB, MNAMS, FIAGE, Fellowship in Reproductive Medicine , Dip in Gyn Endoscopy (Kiel, Germany) Clinical Head & Fertility Specialist Oasis Fertility – Pune For details call: 9015 245 245 WhatsApp: 733 732 8877 www.oasisindia.in

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.