AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

How to Open Demate Account : डिमॅट अकाऊंट म्हणजे काय ? शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी केली जाते ?

तुम्हाला जर शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी 3 खात्यांची (अकाऊंट्स) आवश्यकता असते. ही तीन अकाऊंट्स म्हणजे डिमॅट अकाऊंट, ट्रेडिंग अकाऊंट आणि बँक अकाऊंट. प्रत्येक अकाऊंटचे एक विशिष्ट काम असते, मात्र ट्रॅन्झॅक्शनची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीनही खाती एकमेकांवर अवलंबून असतात. शेअर बाजारात ट्रेडिंग करायचे असेल तर ही तिनही खाती असणे आवश्यक असते.

How to Open Demate Account : डिमॅट अकाऊंट म्हणजे काय ? शेअर्सची खरेदी आणि विक्री कशी केली जाते ?
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
vanita kamble
vanita kamble | Updated on: Aug 01, 2022 | 7:23 PM
Share

डिमॅट अकाऊंट म्हणजे काय ?

डिमॅट अकाऊंट हे बँक अकाऊंटप्रमाणेच असते. मेहनतीने कमावलेले पैसे कोणीही चोरू नयेत यासाठी आपण बचत खात्यात पैसे ठेवतो. तिथे ते डिजीटल करन्सीच्या रुपात असतात. त्याचप्रमाणे डिमॅट अकाऊंट गुंतवणूकदारांसाठी कार्यरत असते. शेअर्स आणि सिक्युरिटीज या डिजीटल स्वरूपात ठेवण्यासाठी डिमॅट किंवा डीमटेरियलाइज्ड अकाऊंट ( dematerialized account)वापरण्यात येते. या अकाऊंटमध्ये शेअर बाजारात खरेदी केलेले शेअर्स हे डिजीटल स्वरूपात ठेवण्यात येतात. खरेदी केलेले शेअर्स डिजीटल स्वरूपात ठेवण्याच्या या प्रक्रियेला डीमटेरिअलायझेशन, असे म्हटले जाते. ट्रेडिंग झाल्यानंतर हे शेअर्स अकाऊंटमध्ये क्रेडिट अथवा डेबिट केले जातात.

डीमॅट अकाऊंटचे प्रकार

गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रोफाईलनुसार, काळजीपूर्वकरित्या डिमॅट अकाऊंट उघडावे. भारतातील कोणीतीही व्यक्ती अवघ्या काही मिनिटात ऑनलाइन डिमॅट अकाऊंट उघडू शकते. गुंतवणूकदार डिपॉझटरी सहभागी सह (Depository Participant- DP) डिमॅट अकाऊंट उघडू शकतात. 5Paisa https://bit.ly/3RreGqO येथे तुम्ही सहज, सोप्या पद्धतीने डिमॅट अकाऊंट उघडून ट्रेडिंग सुरू करू शकता. डिमॅट अकाऊंटचे चार प्रकार आहेत.

1) रेग्युलर डिमॅट अकाऊंट

ज्या भारतीय गुंतवणूकदारांना केवळ शेअर्सची खरेदी-विक्री करायची आहे आणि सिक्युरिटीज डिपॉझिट करायच्या आहेत, त्यांच्यासाठी सामान्य डिमॅट अकाऊंट असते. जेव्हा तुम्ही शेअर्स विकाल, तेव्हा ते याच अकाऊंटमधून डेबिट ( वजा) होतील. आणि जर तुम्ही काही शेअर्स खरेदी केलेत, तर ते या अकाऊंटमध्येच क्रेडिट (जमा) होतील. मात्र तुम्ही इतर पर्यायांमध्ये ट्रेडिंग करत असाल तर डिमॅट अकाऊंट आवश्यक नाही. कारण अशा व्यवहारांमध्ये स्टोरेजची गरज लागत नाही.

2) बेसिक सर्व्हिस डिमॅट अकाऊंट

मार्केट रेग्युलेटर ‘सेबी’ तर्फे (SEBI)हे एक नवे अकाऊंट सादर करण्यात आले आहे. छोट्या गुंतवणूकदारांना लक्षात ठेऊन या अकाऊंटची सुरुवात करण्यात आली आहे. या अकाऊंटमध्ये 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे स्टॉक्स आणि बॉण्ड्स ठेवण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र 50 हजार ते 2 लाख रुपयांचे पर्यंतचे स्टॉक्सस वा बॉण्ड्स ठेवल्यास 100 रुपये शुल्क भरावे लागते.

3)Repatriable Demat account

Repatriable डिमॅट अकाऊंट हे अनिवासी भारतीयांसाठी (NRI) असते. या अकाऊंटद्वारे ते भारतीय (शेअर) बाजारात गुंतवणूक करू शकतात. तसेच परदेशात पैसे हस्तांतरित करू शकतात. मात्र , या प्रकारचे डिमॅट अकाऊंट हे NRE (Non-Resident External) अकाऊंटशी जोडणे बंधनकारक आहे.

4)Non-repatriable Demat Account

Non-repatriable डिमॅट अकाऊंट, हेही अनिवासी भारतीयांसाठीच (Non-resident Indians NRIs) आहे. पण या अकाऊंटच्या माध्यमातून परदेशात पैसे हस्तांतरित करता येत नाहीत.

डिमॅट अकाऊंटचे फायदे

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे अनिवार्य आहे. डिमॅट अकाऊंट उघडण्याचे अनेक फायदे आहेत. डिमॅट अकाऊंटमुळे शेअर्सचे हस्तांतरण जलदरित्या, कोणत्याही अडचणीशिवाय होते. डिमॅट अकाऊंटमध्ये ठेवलेले शेअर्स वा इतर सर्टिफिकेट्स हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असतात. त्यामुळे शेअर्सची चोरी अथवा ते गहाळ होण्याची शक्यता शून्य असते. डिमॅट अकाऊंट ऑनलाइन असल्याने पूर्णपणे सुरक्षित आहे व आपण ते कधीही, कुठूनही चालवू शकतो. बोनस स्टॉक, स्प्लिट शेअर्स हे आपोआप खात्यात जमा होतात.

कसे उघडावे डिमॅट अकाऊंट ?

भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट अकाऊंट असणे अनिवार्य असते. तुम्ही एखादा ब्रोकर अथवा वित्तीय संस्थेमार्फत डिमॅट अकाऊंट उघडू शकता. डिमॅट अकाऊंट उघडण्यासाठी प्रथम तुम्हाला डिपॉझिटरी सहभागी (डीपी) याची निवड करावी लागेल. एखादी वित्तीय संस्था, अधिकृत बँक किंवा ब्रोकर यांची तुम्ही डीपी म्हणून निवड करून डिमॅट अकाऊंट उघडू शकता. डिपॉझिटरी सहभागीची (डीपी) निवड ही ब्रोकरेज ( शुल्क), वार्षिक शुल्क आणि लीव्हरेज , या आधारावर करण्यात यावी. डीपीची निवड झाल्यानंतर डीपीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन डिमॅट अकाऊंट उघडण्याचा फॉर्म भरा. त्यानंतर केवायसी ( KYC)फॉर्मही भरा. त्यासह तुम्हाला काही कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यामध्ये पॅन कार्ड, निवासाचा पुरावा, ओळखपत्राचा पुरावा आणि पासपोर्ट साइज फोटोग्राफ द्यावे लागतील. व्हेरिफिकेशन (पडताळणी) प्रक्रियेवेळी सर्व ओरिजनल कागदपत्रे तुमच्या जवळ ठेवा. त्यानंतर बँक डिटेल्स देण्यासाठी तुम्हाला एक कॅन्सल्ड चेकही द्यावा लागेल.

पडताळणी प्रक्रियेनंतर तुम्हाला डिपॉझिटरी सहभागीसोबत करारावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात येईल. या करारामध्ये डिपॉझिटरी सहभागी आणि गुंतवणूकदार यांच्या सर्व जबाबदाऱ्यांची आणि हक्कांची माहिती दिलेली असते. ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच नंतर सह्या कराव्यात. आजकाल बरेच प्लॅटफॉर्म्स ऑनलाइन डिमॅट अकाऊंट उघडण्याची सुविधाही देतात. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमचे डिमॅट अकाऊंट उघडू शकता.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड