एक, दोन, तीन बोलताच तिने 270 किलो वजन उचललं, पण अचानक…राष्ट्रीय खेळाडूचा दुर्देवी शेवट
काही काळापूर्वी यष्टिकाने गोव्यात आयोजित 33 व्या नॅशनल बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये इक्विप्ड कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं. क्लासिक कॅटेगरीत सिल्वर मेडल मिळवलेलं.

जीममध्ये पावरलिफ्टिंगची प्रॅक्टिस करताना राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्यचा दुर्देवी मृत्यू झाला. यष्टिकाने मानेवर 270 किलोच वजन उचललं होतं. त्यावेळी अचानक पकड निसटल्याने संतुलन बिघडलं आणि वजनाचा भार मानेवर कोसळला. या वजनामुळे मान मोडली. या अपघातानंतर यष्टिकाला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. राजस्थानच्या बीकानेरमध्ये ही भयानक घटना घडली.
राजस्थानच्या बीकानरेमध्ये नत्थूसर गेटवर गणेश मंदिराजवळ पावर हेडक्टर जीममध्ये यष्टिका आचार्य प्रॅक्टिस करत होती. यष्टिका राष्ट्रीय स्तरावरची पावरलिफ्टर आहे. तिने मानेवर रॉड ठेऊन 270 किलो वजन उचलेलं. यावेळी बॅलन्स गेल्याने रॉड मानेवर पडून यष्टिकाचा मृत्यू झाला. जीममध्ये तिच्यासोबत प्रॅक्टिस करणाऱ्या अन्य दोन खेळाडूंनी सांगितलं की, यष्टिका नेहमीप्रमाणे कोचच्या उपस्थितीत प्रॅक्टिस करत होती.
अचानक हाताची पकड निसटली
ट्रेनर यष्टिकाला वेट लिफ्ट करण्यासाठी मदत करत होते. एक, दोन, तीन बोलल्यानंतर तिने वजन उचललं. पण अचानक हाताची पकड निसटल्याने संतुलन बिघडलं. सगळ्या वजनाचा भार तिच्या मानेवर कोसळला. यष्टिकाला स्वत:ला संभाळता आलं नाही. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
कुटुंबियांची रडून रडून वाईट अवस्था
काही काळापूर्वी यष्टिकाने गोव्यात आयोजित 33 व्या नॅशनल बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये इक्विप्ड कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं. क्लासिक कॅटेगरीत सिल्वर मेडल मिळवलेलं. यष्टिकाचे वडील ऐश्वर्य आचार्य कॉन्ट्रॅक्टर आहेत. यष्टिकाच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. कुटुंबियांची रडून रडून वाईट अवस्था आहे.
म्हणून FIR ची नोंद नाही
या प्रकरणात कुटुंबियांनी अजूनपर्यंत कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही असं पोलिसांनी सांगितलं. म्हणून FIR ची नोंद झालेली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला नंतर कुटुंबियांकडे सुपूर्द केला. पोलिसांकडून तपास सुरु आहे.
