AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दगडफेक झाली, पुरुष बनून केला सराव; जिद्दी महिलेनं एशियन गेम्स गाजवलं, पण जपानपर्यंत पोहोचणं सोप नव्हतं…

Asian Games 2026 : एक महिला देशाच्या निर्बंधांना झुगारुन टाकते आणि एशियन गेम्समध्ये तिचे नाव तिच्या देशाचे नाव मोठे करते. ही कहाणी प्रत्यकाच्या मनाचा ठाव घेत आहे. फरिबाला स्वतचं खरं रुप सोडून चक्क पुरुषाच्या वेशात रहावं लागलं.

दगडफेक झाली, पुरुष बनून केला सराव; जिद्दी महिलेनं एशियन गेम्स गाजवलं, पण जपानपर्यंत पोहोचणं सोप नव्हतं...
afghan cyclist fariba hashmiImage Credit source: social media
| Updated on: Sep 22, 2026 | 4:50 PM
Share

खेळाच्या जगामध्ये रोज विविध घटना घडतात. रोज काहीना काही नवीन कहानी समोर येते. जगभरातील खेळाडूंकडून सध्या एशियन गेम्समध्ये चांगली कामगिरी करण्याचे लक्ष ठेवले जात आहे. पण अफगाणिस्तानमध्ये काही अशा गोष्टी आहेत जिथे हे सर्वकाही सामान्य नाही. खासकरुन महिलांसाठी तिथे मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. पण खेळाचा उत्साह हा कोणत्याही क्रिडाप्रेमीला शांत बसू देतच नाही. त्याचप्रमाणे आता ही नवी घटनाही समोर आली आहे. एशियन गेम्समध्ये स्वप्नपुर्ती करण्यासाठी चक्क पुरुषाच्या वेशात एका अफगाणी महिलेला सराव करावा लागला. स्वतःच्या स्वप्नांना गवसणी घालण्यासाठी तिची काहीही करायची तयारी होती. ज्यामधून तिने हे पाऊल उचलले. त्यामुळे या महिलेचे सध्या जगभरातून कौतुक केले जात आहे. अफगाणी महिला सायकलपटू फरीबा हाश्मी हिने मंगळवारी रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं.

तिने सांगितलं की, माझ्या या कामगिरीनंतर देशातल्या इतर महिलांनाही प्ररणा मिळेल ज्यांच्या स्वातंत्र्यावर सध्या तालिबान अधिकाऱ्यांनी निर्बंध लादले आहेत. सध्या इटलीमध्ये राहत असलेल्या फरिबाने जपानमधील नागोयाजवळ पार पडलेल्या महिलांच्या रोड रेसमध्ये दुसरे स्थान पटकारवले आहे. यानंतर तिने स्वतःच्या भावनांही व्यक्त केल्या आहेत.

मला नेमकं काय वाटत आहे हे मी सध्या शब्दांमध्ये सांगू शकत नाही. मी किशोरवयातच माझ्या लहान बहिणीसोबत खेळाला सुरुवात केली. माझी बहिणही एक चांगली सायकलपटू आहे. पण खेळाचा सराव करतानाच माझ्यावर आणि बहिणीवर दगडफेक झाली होती. ज्यामुळे मला पुरुषांच्या वेश परिधान करुन माझं प्रशिक्षण पूर्ण करण्याची वेळ आलाी. मी अशा देशात जन्मले आहे जिथे स्वप्न पाहणाऱ्या महिलांवर जीवघेणे हल्ले केले जातात. मला आनंद आहे की मी अशा वृत्तीविरुद्ध लढले आणि जिंकले. मला आशा आहे की माझी पुढची पिढी इथपर्यंत पोहेचेल यशाची नवी शिखरे सर करेल.

दरम्यान, इटलीची माजी विश्वविजेती अलसेंड्रा कॅपेलोटो हिच्या मदतीने हाश्मी ही अफगाणिस्तानातून इटलीला पोहोचली. तिथेच तिने प्रशिक्षण घेतलं. विशेष म्हणजे एशियन गेम्ससाठी ती जपानला पोहोचली पण तिच्यासोबत मेकॅनिकही सायकलचा नव्हता. सायकल स्वतः धुवून दुरुस्त करत होती. पण त्याचवेळी तिला जपानच्या मेकॅनिकने मदत केली. याबद्दल तिने जपानचे आभार मानले आहेत.

Follow Us
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा