AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Tariff : रशियाचं कारण फक्त नावाला, अमेरिका भारतावर इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावतेय त्यामागे त्याच्या मनात फक्त एकच भिती

US Tariff : भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. त्यामुळे रशियाला आर्थिक फायदा होऊन त्यांना युक्रेन विरोधात लढण्यासाठी बळ मिळतं एवढाच एक हेतू हा कायदा आणण्यामागे आहे का?. टॅरिफ म्हणून अमेरिका लावतेय का? जाणून घ्या त्या मागचं खरं कारणं.

US Tariff : रशियाचं कारण फक्त नावाला, अमेरिका भारतावर इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावतेय त्यामागे त्याच्या मनात फक्त एकच भिती
Modi-Trump
| Updated on: Sep 22, 2026 | 4:43 PM
Share

अमेरिका थेटपणे भारताला टॅरिफची धमकी देत नाही. पण भारताची रशियासोबतची मैत्री, इराणशी असलेले संबंध अमेरिकेला खटकतात. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून दोन्ही देशांच्या संबंधात अनेकदा तणाव निर्माण झाला आहे. सध्या ट्रम्प प्रशासनाचे निर्णय पाहिले तर भारताला रोखण्यासाठी ते वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत आहेत असचं वाटतं. या महिन्यात अमेरिकन संसदेत ‘लिंडसे ओ. ग्राहम सँक्शनिंग रशिया अँड इराण एक्ट’ विधेयक मंजूर झालं. या विधेयकावर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. या कायद्यामुळे अमेरिकी प्रशासनाला रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याचा अधिकार मिळणार आहे. या क्षेत्रातील जाणकारांनुसार अमेरिकेने हा कायदा आणण्यामागे त्यांचं मुख्य टार्गेट भारत आणि चीन हे दोनच देश आहेत.

भारत रशियाकडून तेल खरेदी करतो. त्यामुळे रशियाला आर्थिक फायदा होऊन त्यांना युक्रेन विरोधात लढण्यासाठी बळ मिळतं एवढाच एक हेतू हा कायदा आणण्यामागे आहे का?. आर्थिक महाशक्ती म्हणून भारताचा उदय रोखण्याची इच्छा यामागे आहे का?. इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येतं की, जेव्हा-जेव्हा अमेरिकेला आर्थिक आघाडीवर आव्हान मिळतं, तेव्हा-तेव्हा अमेरिकेकडून दबावाची रणनिती वापरली जाते.1998 साली भारताने पोखरणमध्ये अणूबॉम्ब चाचणी केल्यानंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते. पण तीन वर्षांनी 2001 मध्ये जॉर्ज डब्ल्यू. बुश प्रशासनाने हे निर्बंध मागे घेतले.

या वाक्यातच सर्वकाही येऊन जातं

आता 25 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतावर टॅरिफच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय.यावेळी सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदीचं कारण दिलं जातय. आंतरराष्ट्रीय एक्सपर्ट्सनुसार, अमेरिकेकडून हे सर्व सुरु आहे, त्यामागे फक्त एकच कारण आहे, जागतिक स्तरावर अमेरिकेच्या आर्थिक संपन्नतेला आव्हान देणारा भारत दुसरा आशियाई देश बनू नये. याचवर्षी मार्च महिन्यात अमेरिकेचे उप विदेश मंत्री क्रिस्टोफर लँडौ यांच्या एका स्टेटमेंटवर नजर टाकली तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. ‘अमेरिका भारताच्या बाबतीत ती चूक करणार नाही, जी 20 वर्षांपूर्वी त्यांनी चीनच्या बाबतीत केली होती’ क्रिस्टोफर यांच्या या वाक्यातच सर्वकाही येऊन जातं.

हेच सध्या अमेरिकेचं मुख्य लक्ष्य

बऱ्याच बाबतीत भारत स्वयंपूर्ण होतोय. भारताची ही प्रगती अशीच सुरु राहिली, तर भविष्यात आशियातून अमेरिकेसमोर अजून एक आव्हान उभं राहिलं. सध्या अमेरिकेसमोर चीन-रशिया या दोन देशांचं आव्हान आहे. त्यात भारताचाही समावेश झाला, तर अमेरिकेच्या अडचणी अजून वाढतील. म्हणून भारताची आर्थिक घौडदौड रोखणं हेच सध्या अमेरिकेचं मुख्य लक्ष्य आहे.

Follow Us
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा