VIDEO: राशिद खानची रहस्यमयी गोलंदाजी, 4 चेंडूत 4 विकेट्स

VIDEO: राशिद खानची रहस्यमयी गोलंदाजी, 4 चेंडूत 4 विकेट्स

देहरादून: अफगाणिस्तान आणि आयर्लंड (Afghanistan vs Ireland t20) यांच्यातील तीन टी 20 मालिकेत अफगाणिस्तानने 3-0 असा विजय मिळवला. भारतातील देहरादूनमध्ये झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (Afg vs Ire 3rd t20) अफगाणिस्तानने आयर्लंडचा 32 धावांनी पराभव केला.  या सामन्यात अफगाणिस्तानचा जादूई फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) रहस्यमयी गोलंदाजी करत चार चेंडूत 4 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:22 PM

देहरादून: अफगाणिस्तान आणि आयर्लंड (Afghanistan vs Ireland t20) यांच्यातील तीन टी 20 मालिकेत अफगाणिस्तानने 3-0 असा विजय मिळवला. भारतातील देहरादूनमध्ये झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (Afg vs Ire 3rd t20) अफगाणिस्तानने आयर्लंडचा 32 धावांनी पराभव केला.  या सामन्यात अफगाणिस्तानचा जादूई फिरकीपटू राशिद खानने (Rashid Khan) रहस्यमयी गोलंदाजी करत चार चेंडूत 4 विकेट्स घेण्याचा विक्रम केला. राशिदची गोलंदाजी आयर्लंडच्या फलंदाजांना समजलीच नाही. त्यामुळे राशिदने सलग 4 चेंडूत 4 विकेट्स घेत टी 20 मध्ये नवा विक्रम रचला.

राशिद खानने (Rashid Khan) 16 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आयर्लंडच्या केविन ओ ब्रायनला (74) बाद केलं. मग पुढच्या षटकात त्याने डॉकरेल (18), गेटकेट (2) यांना बाद करुन हॅटट्रिक नोंदवली. पण त्यानंतरही राशिदचा कहर सुरुच राहिला. राशिदने पुढच्या चेंडूवर सिमी सिंहला शून्यावर बाद करुन, सलग चार चेंडूत चार विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला.

या सामन्यात राशिदने 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. राशिद हा टी 20 मध्ये हॅटट्रिक आणि पाच विकेट घेणारा पहिला फिरकीपटू ठरला.

दरम्यान, या सामन्यात अफगाणिस्ताने 20 षटकात 7 बाद 210 धावांचा डोंगर रचला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडनेही 20 षटकात 8 बाद 178 धावांपर्यंत मजल मारली. आयर्लंडकडून केविन ओ ब्रायनने 47 चेंडूत 74 धावा ठोकल्या. त्याआधी अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीने 36 चेंडूत 81 धावा कुटल्या होत्या.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें