AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Asia Cup 2025 : भारताच्या वागणुकीने जखमी झालेल्या पाकिस्तानने अखेर टीम इंडिया विरोधात उचललं असं पाऊल

IND vs PAK Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये काल टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानी संघावर दणदणीत विजय मिळवला. हा सामना आपण जिंकलो, पण त्यापेक्षा चर्चा सुरु आहे ती भारताने पाकिस्तानी टीमला दिलेल्या वागणुकीची. चिडचिड,अस्वस्थ पाकिस्तानी क्रिकेट टीमने आता भारतीय संघाविरुद्ध एक पाऊल उचललं आहे.

IND vs PAK Asia Cup 2025 : भारताच्या वागणुकीने जखमी झालेल्या पाकिस्तानने अखेर टीम इंडिया विरोधात उचललं असं पाऊल
Ind vs Pak Image Credit source: PTI
| Updated on: Sep 15, 2025 | 9:04 AM
Share

आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं. टीम इंडियाने पाकिस्तानी संघाचा फक्त दणदणीत पराभवच केला नाही, तर त्यांना जाहीरपणे अपमानित सुद्धा केलं. टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला. टॉसच्यावेळी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हात मिळवला नाही. त्या शिवाय मॅच जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी टीमला अजिबात भाव दिला नाही. भारतीय टीमच्या कुठल्याही खेळाडूने पाकिस्तानी टीममधल्या सदस्याशी हस्तांदोलन केलं नाही. पाकिस्तानी खेळाडू हँडशेकसाठी आतुर असताना टीम इंडियाने ही कृती केली. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी टीमशी हस्तांदोलन केलं नाही, त्यावरुन आता वाद निर्माण झालाय. बातमी अशी आहे की, पाकिस्तानी क्रिकेट टीमने या विरोधात आता एक पाऊल उचललय.

टीम इंडियाने हस्तांदोलन न करणं पाकिस्तानच्या जाम जिव्हारी लागलं आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमच्या मॅनेजरने PCB च्या इशाऱ्यावरुन भारतीय टीमची तक्रार केली आहे. त्याआधी कॅप्टन सूर्यकुमार यादवने पाकिस्तानवर मिळवलेला विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरपराध नागरिकांना समर्पित केलाय. भारतीय टीमला टॉप ऑफिशियल्सकडून स्पष्ट आदेश देण्यात आलेले की, त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करु नये. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी त्याच आदेशाच पालन केलं. भारत-पाकिस्तान मॅचच्या अर्धातास आधी एक बैठक झालेली अशी सुद्धा माहिती आहे.

पाकिस्तानी दिग्गजांच यावर म्हणणं काय?

टीम इंडियाकडून मिळालेल्या या वागणुकीनंतर पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटर संतापले आहे. बासित अली म्हणाला की, ‘हा तर आशिया कप आहे. आयसीसी टुर्नामेंटमध्ये सुद्धा असं पहायला मिळू शकतं’ बासित अली सोबत कामरान अकमलने सुद्धा भारताने दिलेल्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. दोघे एका टीव्ही शो च्या कार्यक्रमात बोलत होते. हे क्रिकेटच्या भल्याच नाही असं त्याचं म्हणणं आहे.

‘पहलगाममध्ये जे झालं, ते आम्ही विसरलेलो नाही’

भारताने असं वागून आपले खरे रंग दाखवलेत असं पाकिस्तानचा माजी विकेटकीपर फलंदाज म्हणाला. राशिद लतीफने यावरुन आयसीसीवर निशाणा साधला आहे. प्रश्न विचारलाय की, ते कुठे आहेत?. टीम इंडियाने हस्तांदोलन केलं नाही, म्हणून पाकिस्तानी टीमची जी आदळआपट सुरु आहे, त्यावरुन त्यांना सडतोड उत्तर मिळालय हे स्पष्ट होतं. पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा पोस्ट मॅच प्रेजेंटेशनसाठी आला नाही. टीम इंडियाने आपल्या कृतीतून दाखवून दिलं की, पहलगाममध्ये जे झालं, ते आम्ही विसरलेलो नाही.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.