Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बुमराह खेळणार का? NCA कडून गुड न्यूज

Jasprit Bumrah : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 मार्च रोजी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मॅचआधी भारतीय क्रिकेट चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. टीम इंडिया चार मार्च रोजी सेमीफायनलचा सामना खेळणार आहे.

Jasprit Bumrah : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये बुमराह खेळणार का? NCA कडून गुड न्यूज
Jasprit Bumrah
Image Credit source: instagram
| Updated on: Feb 28, 2025 | 9:21 AM

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये आधीच प्रवेश केला आहे. अजूनही ग्रुप स्टेजचा एक सामना बाकी आहे. 2 मार्च रोजी न्यूझीलंड विरुद्ध हा सामना होणार आहे. त्यानंतर 4 मार्च रोजी टीम इंडिया दुबईमध्ये सेमीफायनल सामना खेळणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याआधी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारतीय फॅन्सना एक गुड न्यूज दिली आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजे NCA मध्ये त्याने गोलंदाजीचा सराव सुरु केलाय. बुमराहने त्याचा एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. या व्हिडिओवरुन सेमीफायनलआधी त्याचा टीम इंडियात समावेश होणार का? अशी चर्चा सुरु झालीय.

पाठिच्या दुखण्यामुळे जसप्रीत बुमराहचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या टीममध्ये समावेश करण्यात आला नाही. स्कॅनचा रिपोर्ट समोर आल्यानंतर त्याला NCA मध्ये पाठवण्यात आलं. तिथे बीसीसीआयच्या मेडीकल टीमच्या देखरेखीखाली त्याचं रिहॅब सुरु आहे. जवळपास एक महिन्यापासून मैदानापासून दूर असलेल्या बुमराहने आता गोलंदाजी सुरु केलीय. व्हिडिओमध्ये तो त्याच जोशमध्ये दिसतोय. 4 मार्चला होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी टीममध्ये समावेश होणं कठीण दिसतय. कारण या मॅचला आता फक्त चार दिवस बाकी आहेत. बीसीसीआयकडूनही या बद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार 22 मार्च पासून सुरु होणाऱ्या आयपीएल ट्रॉफीपासून तो टीममध्ये कमबॅक करु शकतो.

पाच आठवडे आराम करण्याचा सल्ला दिलेला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिडनी कसोटीत बुमराहच्या लोअर बॅकमध्ये त्रास झाला होता. त्यामुळे मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये तो गोलंदाजी करु शकला नव्हता. बीसीसीआयच्या मेडीकल टीमने त्याला पाच आठवडे आराम करण्याचा सल्ला दिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत तो फिट होईल अशी अपेक्षा होती. जसप्रीत बुमराहच्या पाठीवर स्कॅन झाल्यानंतर त्याला स्क्वॉडमधून रिलीज करण्यात आलं. याआधी 2022 सालच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा बुमराह पाठिच्या दुखण्यामुळे खेळू शकला नव्हता.

ही मागणी मान्य होणं कठीण

जसप्रीत बुमराहचा व्हिडिओ पाहिल्यानतंर चाहते आनंदात आहेत. ते बुमरहाचा टीममध्ये समावेश करण्याची मागणी करत आहेत. काही जणांना त्याला सेमीफायनलमध्ये आणि फायनलमध्ये खेळताना पहायच आहे. बुमराहच्या व्हिडिओवर कमेंट करुन त्याला खेळवण्याची मागणी करण्यात येत आहे. चाहत्यांची ही मागणी मान्य होणं कठीण आहे.