विश्वास आहे तोपर्यंत अपेक्षा संपत नाही, रसेलच्या खेळीवर आनंद महिंद्रांचं ट्वीट

बंगळुरु : कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज आंद्रे रसेलने 13 चेंडूत सात षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 48 धावा ठोकल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या या सामन्यात कोलकात्याने विजयाची अपेक्षा जवळपास सोडली होती. तेव्हाच रसेल नावाचं वादळ आलं आणि बंगळुरुच्या हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावला. यानंतर रसेलच्या खेळीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही रसेलच्या खेळीचं कौतुक …

विश्वास आहे तोपर्यंत अपेक्षा संपत नाही, रसेलच्या खेळीवर आनंद महिंद्रांचं ट्वीट

बंगळुरु : कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज आंद्रे रसेलने 13 चेंडूत सात षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 48 धावा ठोकल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्धच्या या सामन्यात कोलकात्याने विजयाची अपेक्षा जवळपास सोडली होती. तेव्हाच रसेल नावाचं वादळ आलं आणि बंगळुरुच्या हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावला. यानंतर रसेलच्या खेळीचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही रसेलच्या खेळीचं कौतुक केलंय.

मी आंद्रे रसेलच्या या 13 चेंडूंचं रेकॉर्डिंग माझ्या जवळ ठेवणार आहे. व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात जेव्हा अपेक्षा संपलेली आहे असं वाटेल तेव्हा हा व्हिडिओ मी पाहत जाईल. तुमचा विश्वास आहे तोपर्यंत कोणतीच गोष्ट कधी संपलेली नसते, असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलंय.

विराट कोहलीच्या आरसीबीला या मोसमातील सलग चौथा पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीने विराट कोहली (84) आणि एबी डिव्हिलियर्स (63) यांच्या खेळीच्या जोरावर 20 षटकात 205 धावांचं आव्हान उभं केलं होतं. आरसीबीच्या गोलंदाजांनीही कोलकात्याच्या फलंदाजांना वेळेतच रोखलं. पण रसेल नावाच्या वादळाने आरसीबीचा पहिला विजय हिरावून घेतला.

VIDEO : पाहा, रसेलचे शेवटचे वादळी 13 चेंडू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *