AUS v IND, Boxing Day Test | पात्रता असूनही संधी न मिळाल्यास त्रास होतो, केएलला वगळल्याने ट्विटरवर नेटकऱ्यांकडून संताप

ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या दुसऱ्या कसोटीत केएल राहुलला संधी मिळाली नाही. यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

AUS v IND, Boxing Day Test | पात्रता असूनही संधी न मिळाल्यास त्रास होतो, केएलला वगळल्याने ट्विटरवर नेटकऱ्यांकडून संताप

मेलबर्न : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 26 डिसेंबरपासून (AUS v IND, Boxing Day Test) दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. या दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये एकूण 4 बदल करण्यात आले. यामध्ये 2 नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली. मात्र केएल राहुलला (K L Rahul) या दुसऱ्या सामन्यातही संधी देण्यात आली नाही. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Anger among netizens for not giving KL Rahul a chance for the second Test against Australia)

केएल राहुलला अशाच प्रकारे पहिल्या कसोटीतही संधी देण्यात आली नव्हती. भारतीय खेळाडूंनी पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. यामुळे टीम इंडियात दुसऱ्या सामन्यासाठी मोठे बदल अपेक्षित होते. दुसऱ्या कसोटीसाठी केएलला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र त्याला संधी न दिल्याने हैराणी व्यक्त केली जात आहे.

पहिल्या सामन्यात सलामीवीर पृथ्वी शॉने निराशाजनक कामगिरी केली. यामुळे पृथ्वीला हटवून केएलला संधी देण्याची मागणी वाढली होती. मात्र केएलला संधी मिळाली नाही. त्यामुळे ट्विटरवर नेटकऱ्यांनी अनेक मीम्स शेअर करत आपले मत मांडले आहेत. तसेच संतापही व्यक्त केला आहे. केएल ट्विटरवर ट्रेंड होतोय.

 

दुसऱ्या सामन्यासाठी 4 बदल

टीम इंडियामध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या सामन्यासाठी एकूण 4 बदल करण्यात आले आहेत. दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी मोहम्म्द सिराजला संधी देण्यात आली आहे. तर पृथ्वी शॉऐवजी शुभमन गिल याचा संघात समावेश करण्यात आला आहे.  या निमित्ताने गिल आणि सिराजचं कसोटी पदार्पण ठरणार आहे. तर विकेटकीपर म्हणून रिद्धीमान साहाला विश्रांती देण्यात आली आहे. त्याऐवजी रिषभ पंतला संधी मिळाली आहे. तसेच विराटच्या जागेवर अष्टपैलू रवींद्र जाडेलाला संधी मिळाली आहे. यामुळे टीम इंडियाच्या बॅटिंगसह बोलिंगलाही मजबूती मिळाली आहे.

केएलची 2020 मधील कामगिरी

केएलने टीम इंडियासाठी 2020 वर्षात अफलातून कामगिरी केली आहे. तसेच त्याने आयपीएलमध्येही शानदार कामगिरी केली. केएलने 2020 या वर्षात टीम इंडियाकडून एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. केएलने 2020 मध्ये एकूण 9 एकदिवसीय सामने खेळला. यामध्ये त्याने 55.37 च्या सरासरीने 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 443 धावा केल्या. तर टी 20 मध्ये त्याने 11 सामन्यात 44.88 सरासरीने 404 धावा केल्या. तसेच केएलने टी 20 मध्ये 2020 वर्षात टीम इंडियाकडून सर्वाधिक अर्धशतकं लगावली आहेत.

आयपीएल 2020 ऑरेंज कॅप

केएलने आयपीएलच्या 13 व्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने या 13 व्या मोसमात सर्वाधिक धावा केल्या. यासाठी त्याला ऑरेंज कॅप देण्यात आली. आयपीएल स्पर्धेत एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात येतं. केएलने एकूण 14 सामन्यात 670 धावा केल्या. आयपीएलच्या 13 व्या मोसमात किंग्ज्स इलेव्हन पंजाबचे आव्हान साखळी फेरीतच संपले. यानंतर अंतिम सामन्यासह एकूण 9 सामने खेळले गेले. मात्र यानंतरही कोणत्याही फलंदाजाला ऑरेंज कॅप मिळवता आली नाही.

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या : 

Australia vs India | पृथ्वी शॉ की केएल राहुल? पाहा आकडेवारी कोणाच्या बाजूने?

AUS v IND, Boxing Day Test | पृथ्वी शॉ, रिद्धिमान साहाला हटवलं, दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात 4 मोठे बदल

(Anger among netizens for not giving KL Rahul a chance for the second Test against Australia)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI