AUS v IND, Boxing Day Test | पृथ्वी शॉ, रिद्धिमान साहाला हटवलं, दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात 4 मोठे बदल

ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

AUS v IND, Boxing Day Test | पृथ्वी शॉ, रिद्धिमान साहाला हटवलं, दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात 4 मोठे बदल

मेलबर्न : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australia vs India Boxing Day Test) यांच्यात उद्यापासून (26 डिसेंबर) दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा दुसरा कसोटी सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असणार आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. (Bcci announced team india squad against australia for boxing day test match)

पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशाजनक कामिगिरी केली. यामुळे टीम इंडियात मोठे बदल करण्यात आले आहेत. या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शुभमन गिल आणि  मोहम्मद सिराज या दोन नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने सिराज आणि गिलचे कसोटी पदार्पण ठरणार आहे. मोहम्मद सिराजला दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. तर शुभमन गिलला पृथ्वी शॉच्या जागी संधी मिळाली आहे. तर दुसऱ्या सामन्यातही केएल राहुलला संधी देण्यात आलेली नाही.

चेतेश्वर पुजारा उपकर्णधार

विराट मायदेशी परतल्याने कर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेकडे आहे. यामुळे चेतेश्वर पुजाराला उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

विकेटकीपर म्हणून पंतला संधी

रिषभ पंतला विकेटकीपर म्हणून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. पंतला रिद्धीमान साहाच्या जागी संधी मिळाली आहे.  तसेच संघात अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजालाही संधी मिळाली आहे. जडेजामुळे टीम इंडियाच्या फलंदाजीला बळकटी मिळणार आहे.  तसेच  जाडेजा आणि  रवीचंद्रन अश्विन यांच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी असणार आहे.

एकूण 3 वेगवान गोलंदाज

टीम इंडिया दुसऱ्या कसोटीसाठी एकूण 5 गोलंदाजांसह मैदानात उतरणार आहे. यामध्ये 2 फिरकीपटू तर 3 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजच्या खांद्यावर असणार आहे.

अशी आहे टीम इंडिया : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

संबंधित बातम्या : 

दुखापतग्रस्त टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार गोलंदाज क्रिकेटपासून आणखी काही महिने दूर

Bcci announced team india squad against australia for boxing day test match

Published On - 12:18 pm, Fri, 25 December 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI