कुणीतरी येणार येणार गं!! अनुष्का-विराटकडे ‘गुड न्यूज’

"आणि... आम्ही तीन होणार! जानेवारी 2021 मध्ये (बाळाचे) आगमन होणार" अशा आशयाचे ट्वीट अनुष्का शर्माने केले आहे.

कुणीतरी येणार येणार गं!! अनुष्का-विराटकडे 'गुड न्यूज'

मुंबई : प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा शिलेदार विराट कोहली यांच्या घरी पाळणा हलणार आहे. खुद्द अनुष्काने आपण आई होणार असल्याची गोड बातमी ट्विटरवर शेअर केली. (Anushka Sharma and Virat Kohli expecting their first child)

अनुष्काने गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास चाहत्यांनाही गुड न्यूज दिली. “आणि… आम्ही तीन होणार! जानेवारी 2021 मध्ये (बाळाचे) आगमन होणार” अशा आशयाचे ट्वीट तिने केले आहे. या फोटोमध्ये अनुष्काचा बेबी बम्पही दिसत आहे.

आयपीएलसाठी विराट सध्या दुबईला गेला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला होता. विराटनेही हाच फोटो शेअर करुन आनंद व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram(Anushka Sharma and Virat Kohli expecting their first child)

 

And then, we were three! Arriving Jan 2021 ❤️🙏

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

इटलीत 2017 मध्ये लग्नगाठ

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली होती. विराट आणि अनुष्का एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या निमित्ताने पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. त्या जाहिरातीवेळी विराट थोडा अस्वस्थ होता. अभिनयाबाबत विराटला तितकीशी माहिती नसल्यामुळे विराट ‘दबावात’ होता. मात्र या जाहिरातीनंतर विराट आणि अनुष्का यांचा एकमेकांशी संवाद वाढला. पुढे त्यांची मैत्री आणि प्रेम झालं. मग मीडियात त्यांच्या अफेयरची चर्चा जोर धरु लागली. त्यानंतर दोघांनी 2017 मध्ये लगीनगाठ बांधली.

इटलीतील विवाह सोहळ्याला अनुष्का आणि विराट यांचे कुटुंब आणि मोजक्या मित्रांसोबत जवळचे नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर दिल्ली आणि मुंबईत त्यांनी दोन भव्य रिसेप्शन आयोजित केली होती. चाहते दोघांना ‘विरुष्का’ नावाने बोलवत असल्याने त्यांनी गुड न्यूज शेअर करताच हा शब्द सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला.

अनुष्काचे मोठ्या पडद्यावरील अखेरचे दर्शन शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत 2018 च्या ‘झिरो’ चित्रपटात झाले होते. तिने अलिकडेच ‘पाताल लोक’ आणि बुलबुल सारख्या वेब सिरीजची निर्मिती केली आहे. (Anushka Sharma and Virat Kohli expecting their first child)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI