जे जोडे घालून वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, ते जोडे विकून कोरोना लढ्यासाठी 3 लाख, गोल्फर अर्जुन भाटीचं कौतुक

| Updated on: Apr 22, 2020 | 2:00 PM

तरुण गोल्फर अर्जुन भाटी याने त्याचे फाटलेले जोडे त्याच्या काकाला विकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्स फंडला 3 लाख 30 हजार रुपयांची मदत केली आहे.

जे जोडे घालून वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली, ते जोडे विकून कोरोना लढ्यासाठी 3 लाख, गोल्फर अर्जुन भाटीचं कौतुक
Follow us on

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या लढाईत सरकारला (Arjun Bhati Help) मदत करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. सेलिब्रिटींपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वच या लढाईत आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. या दरम्यान, तरुण गोल्फर अर्जुन भाटीने त्याचे फाटलेले जोडे काकाला विकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम केअर्स फंडला 3 लाख 30 हजार रुपयांची मदत केली आहे. अर्जुनने हे फाटलेले जोडे घालून अमेरिकेत ‘ज्युनियर गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2018’ जिंकली (Arjun Bhati Help) होती.

तुमची सेवा प्रेरणा देणारा आहे : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्जुनच्या या मदतीचं कौतुक केलं आहे. याबाबत ट्विट करत मोदींनी त्याचं कौतुक केलं. “तुमची भावना देशासाठी अनमोल आहे. या कठीण परिस्थितीत तुमची सेवा इतरांसाठी प्रेरणा देणारी आहे.”

यापूर्वीही अर्जुनने ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. “मी ज्या फाटलेल्या जोड्यांवर अमेरिकेत ‘ज्युनियर गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2018’ जिंकली होती. ते जोडे काका वनिश प्रधान यांनी विकत घेतले. त्यातून मिळवलेली रक्कम मी पीएम केअर्स फंडमध्ये दान केली. आम्ही राहू किंवा नाही, पण माझा देश राहिला पाहिजे (Arjun Bhati Help), कोरोनापासून सर्वांना वाचवायचं आहे”, असं त्याने सांगितलं होतं.

दिल्लीच्या ग्रेटर नोएडामध्ये राहणाऱ्या अर्जुन भाटीने आतापर्यंत 150 गोल्फ स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 15 वर्षीय अर्जुनने 2018 मध्ये कॅलिफोर्निया येथील ‘ज्युनियर गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2018’ जिंकली होती. त्यापूर्वी त्याने 2016 मध्ये 12 वर्षाखालील आणि 2018 मध्ये 14 वर्षाखालील गोल्फ वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे(Arjun Bhati Help).

संबंधित बातम्या :

कोरोनाविरेधातील लढ्यात जगातील टॉप 10 नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर, डोनाल्ड ट्रम्प कितव्या स्थानी?

गुड न्यूज! एका दिवसात 705 ‘कोरोना’ग्रस्त बरे

Corona : चेन्नईतील न्यूज चॅनलमधील 25 जणांना कोरोना, लाईव्ह प्रसारण थांबवलं

Corona : आधी राष्ट्रपती भवन, आता लोकसभा सचिवालयात कोरोनाची एन्ट्री, स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्याला कोरोना