AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या साखरपुड्यानंतर घरात कलह, थेट पोलिसात प्रकरण, सचिनच्या सूनेच्या आई वडिलांवर थेट..

अर्जुन तेंडुलकर याने काही दिवसांपूर्वीच सानिया चंडोक हिच्यासोबत साखरपुडा केला. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये हा साखरपुडा पार पडला. सचिन तेंडुलकरची होणारी सून कोण? यावर जोरदार चर्चा ही रंगताना दिसली. आता या साखरपुड्यानंतर या कुटुंबात मोठा कलह होत असल्याचे पुढे आले असून वाद थेट पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.

अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांच्या साखरपुड्यानंतर घरात कलह, थेट पोलिसात प्रकरण, सचिनच्या सूनेच्या आई वडिलांवर थेट..
Arjun Tendulkar and Sania Chandok
| Updated on: Sep 13, 2025 | 2:40 PM
Share

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा पार पडलाय. अर्जुन तेंडुलकर याने देखील काही वर्षांपूर्वीच आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. अर्जुन तेंडुलकर अजून क्रिकेटमध्ये आपले नाव कमावण्यासाठी प्रयत्न करतोय. काही दिवसांपूर्वीच अर्जुनचा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा पार पडला. सचिनचा लेक लवकरच रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. विशेष म्हणजे अर्जुन आणि सानिया हे दोघे लहानपणापासूनचे खास मित्र आहेत. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सोशल मीडियावर सानिया आणि अर्जुनचे बरेच फोटो हे बघायला मिळतात.

आता घई कुटुंबातील कलह पुढे आला असून थेट पोलिस स्टेशनपर्यंत वाद पोहोचला आहे. प्रसिद्ध ग्रॅव्हिस समूहाचे अध्यक्ष गौरव घई यांनी आपले वडील रवी घई , बहीण आणि मेहुणे यांच्या विरोधात थेट फसवणुकीचा आणि खंडणी असे गंभीर आरोप करत कफ परेड पोलिस स्टेशनमध्ये थेट तक्रार दाखल केली. यामुळे अर्जुन तेंडुलकर याच्या सासरवाडीकढील काैटुंबिक कलह परत उठल्याचे बघायला मिळतंय. अर्जुन तेंडुलकर याच्या सासूबाई गाैरिका चंडोक, सासरे जसप्रीत चंडोक आणि मेहुना इशान यांच्या विरोधात थेट फसवणूक आणि खंडणीची तक्रार देण्यात आली

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गौरव घई यांनी वडील रवी घई, भाऊजी जसप्रीत चंडोक, बहीण गाैरिका चंडोक हेच नाही तर भाचा इशान चंडोक यांच्यावर गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली. यामध्ये फक्त सचिन तेंडुलकर याची होणारी सून आणि अजून तेंडुलकर यांची होणारी पत्नी सानिया चंडोक हिच्या नावाचा समावेश नाही. बाकी अख्या कुटुंबावर फसवणुकीचा आणि खंडणीचा आरोप करत तक्रार करण्यात आली.

मुळात म्हणजे घई कुटुंबातील वाद हा फार जुना आहे. गौरव घई यांनी केलेल्या तक्रारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, घई कुटुंबातील सदस्यांनी 2021 आणि 2023 मध्ये कौटुंबिक समझोता करार केला होता. यानुसार, गौरवने त्याचे वडील रवी घई यांना 240 कोटी रुपये दिले होते आणि बाकी वार्षिक 1.5 कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, जीएचएलचे 2.29 कोटी शेअर्सचे मालकी हक्क रवी घई यांच्या मृत्यूनंतर गौरवला यांना मिळणार होते, असे स्पष्ट त्या करारात सांगण्यात आले. सॅटिनेटा एलएलपीमधील 49 टक्के भागीदारी देखील कराराचा भाग म्हणून रवी घई यांच्याकडे सोपवली.

रवी घई यांनी गौरव हा करत असलेले आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे. यासोबतच गाैरव याने असेही म्हटले की, माझ्या वडिलांना कॅन्सर झाला नाहीये. माझी बहीण ही फक्त आणि फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी हा बनाव करत आहे. आता घई कुटुंबातील वाद चांगलाच वाढल्याचे बघायला मिळतंय. सानिया आणि अर्जुन यांचा साखरपुडा झाल्यापासून हा वाद अधिकच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय.

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.