AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Hazare Trophy : अर्जुन तेंडुलकरचे करिअरमधील बुरे दिन, आता शुबमन गिलच्या टीमसमोर अशी हालत, किती चेंडूत खेळ खल्लास?

Vijay Hazare Trophy : अर्जुन तेंडुलकर डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. फलंदाजीत नाही निदान तो गोलंदाजी छाप पाडेल अशी अपेक्षा आहे. अर्जुन तेंडुलकर सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाकडे नेहमीच मीडियाचं लक्ष असतं.

Vijay Hazare Trophy : अर्जुन तेंडुलकरचे करिअरमधील बुरे दिन, आता शुबमन गिलच्या टीमसमोर अशी हालत, किती चेंडूत खेळ खल्लास?
Arjun Tendulkar-Shubaman GillImage Credit source: X/PTI
| Updated on: Jan 06, 2026 | 1:15 PM
Share

Arjun Tendulkar-Shubman Gill : विजय हजारे ट्रॉफीमध्ये खराब फॉर्म अर्जुन तेंडुलकरची पाठ सोडत नाहीय. पंजाब विरुद्धच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा हेच दिसून आलय. मागच्या चार सामन्यात अर्जुन तेंडुलकर फलंदाजीमध्ये फ्लॉप ठरलेला. आता पंजाब टीमने सुद्धा त्याची तशीच हालत केली आहे. अर्जुन तेंडुलकर गोव्याच्या टीमकडून खेळतोय. या सामन्यात तो 10 चेंडू सुद्धा खेळू शकला नाही. या टुर्नामेंटमध्ये सर्वात छोटा स्कोर त्याने याच मॅचमध्ये बनवला. पंजाब विरुद्ध गोव्याची टीम पहिली फलंदाजी करण्यासाठी उतरली. गोव्याकडून अर्जुन तेंडुलकर आणि कश्यक बाकले ओपनिंगला आलेले. दोघांकडून चांगल्या ओपनिंगची अपेक्षा होती. पण अर्जुन तेंडुलकरचा खराब फॉर्मने इथेही पाठलाग सोडला नाही. शुबमन गिलच्या पंजाब टीम विरुद्ध अर्जुन तेंडुलकरचा खेळ 10 चेंडूत संपला.

डावखुऱ्या अर्जुन तेंडुलकरने पंजाब विरुद्ध 8 चेंडूंचा सामना केला. अवघी 1 धाव करुन तो आऊट झाला. सुखदीप बाजवाने त्याला प्रभसिमरन सिंहकडे कॅच द्यायला लावून पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. आतापर्यंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलेल्या पाच सामन्यातील अर्जुन तेंडुलकरचा हा सर्वात लोएस्ट स्कोर आहे. याआधी हिमाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यातही त्याने एक रन्स केलेला. पण त्यावेळी तो नाबाद होता.

सर्वात जास्त स्कोर मुंबई विरुद्ध

विजय हजारे ट्रॉफीच्या चालू सीजनमध्ये अर्जुन तेंडुलकरच्या खराब फॉर्मचा अंदाज तुम्ही आकड्यांवरुन लावू शकता. आतापर्यंत खेळलेल्या पाच सामन्यात पाच डावात अर्जुन तेंडुलकरने फक्त 53 धावा केल्या आहेत. 3 सामन्यात त्याने ओपनिंग केली. 2 सामन्यात तो मधल्या फळीत फलंदाजीला आला. त्याचा सर्वात मोठा स्कोर 24 धावा आहे. मुंबई विरुद्ध ओपनिंग करताना त्याने या धावा केल्या होत्या.

गोलंदाजीत छाप पाडेल अशी अपेक्षा

अर्जुन तेंडुलकर डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. फलंदाजीत नाही निदान तो गोलंदाजीत छाप पाडेल अशी अपेक्षा आहे. अर्जुन तेंडुलकर सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाकडे नेहमीच मीडियाचं लक्ष असतं. अर्जुन तेंडुलकरचा काही महिन्यांपूर्वी साखरपुडा झालाय. सध्या अर्जुन करिअरमधील बॅड पॅचचा सामना करतोय.

सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले
सत्ता आमच्यासाठी नकोय, पण...; राज ठाकरे स्पष्टच बोलले.
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
... ते मुंबईत जन्मल्यावर समजेल; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना.
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा
आमदार फोडायला 200 कोटी 2 हजार कोटी कर्ज काढून आणले? राज ठाकरेंचा दावा.
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा
राजकारणातील पैशांचा ड्रग्सशी संबंध? राज ठाकरेंनी केला खळबळजनक दावा.
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान
मुंबईकर म्हणून मला लाज वाटते! महेश मांजरेकरांनी केलं मोठं विधान.
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका
ससाने जागा अदानीच्या तोंडात घालतायत! उद्धव ठाकरेची सरकारवर टीका.
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे
मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू - राज ठाकरे.
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?
महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ? काय म्हणाले ठाकरे बंधू ?.
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.