AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arshdeep Singh: अर्शदीप सिंग अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड, दिली प्रेमाची जाहीर कबुली; कोण आहे ‘ती’, दोघांच्या वयात किती अंतर?

अर्शदीप सिंग आणि समरीन कौर एकमेकांना डेट करतात ही अफवा मागील काही महिन्यांपासून सुरु होती. आता अर्शदीप सिंगने एक फोटो पोस्ट करत अखेर या अफवेवर आपले मौन सोडले आहे.

Arshdeep Singh: अर्शदीप सिंग अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड, दिली प्रेमाची जाहीर कबुली; कोण आहे 'ती', दोघांच्या वयात किती अंतर?
| Updated on: Jul 27, 2026 | 11:11 AM
Share

भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. आयपीएलमध्ये जेव्हा त्याचे आणि त्याची गर्लफ्रेंड समरीन कौरसोबतचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले होते. तेव्हा हे दोघे एकमेकांना डेट करतात अशा चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोखाली कमेंट करताना दिसता. पण त्यांनी त्यांचे नाते अधिकृत केले नव्हते. आता मात्र अर्शदीप सिंगने त्यांचे हे नाते अधिकृत केले आहे.  आता अर्शदीपने इंस्टाग्रामवर समरीनसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. या फोटोखाली त्याने ‘My Person’ असं लिहिले आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  तर आता भारतीय वेगवाल गोलंदाज ज्या समरीन कौरला डेट करतोय ती नेमकी कोण आहे तिच्याबद्दल जाणून घ्या…

7 सप्टेंबर 1999 रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये समरीन कौरचा जन्म झाला. तिने पुण्यातील प्रतिष्ठित सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून बी.कॉम (ऑनर्स) पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर, आपला मोर्चा मॉडेलिंगकडे वळवला. 2018 च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिने जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधित्व करत अंतिम फेरीत गाठली. तिला ही स्पर्धा जिंकता आली नाही. पण अनेक मोठ्या ब्रँड्सकडून आणि मॉडेलिंगच्या कामांच्या ऑफर्स येऊ लागल्या, ज्यामुळे तिने अभिनयाच्या जगात प्रवेश केला. समरीनने स्वतःला केवळ मॉडेलिंगपुरते मर्यादित ठेवले नाही, तर चित्रपट क्षेत्रातही आपल्या अभिनयाने ठसा उमटवला. तिने लोकप्रिय लीगल थ्रिलर वेब सिरीज ‘नेल पॉलिश’ मध्ये अर्जुन रामपालसोबत मुख्य भूमिका साकारली. ती रणवीर सिंगच्या ’83’ या चित्रपटातही दिसली होती, ज्यात तिने क्रिकेटपटू बलविंदर सिंग संधू (अम्मी विर्क) याची होणारी पत्नी सिमरनची भूमिका साकारली होती. ती पंजाबी सिनेमातील हिट चित्रपट ‘सरदार जी 2’ चा देखील एक भाग होती. अभिनयाव्यतिरिक्त, समरीन अनेक लोकप्रिय पंजाबी आणि हिंदी संगीत व्हिडिओंमध्ये दिसली आहे. तिने जुबिन नौटियाल, बादशाह आणि गुरू रंधावा यांसारख्या आघाडीच्या गायकांसोबत काम केले आहे. तिची ‘बावला’ आणि ‘तुझे भूलना तो चाहा’ ही गाणी इंटरनेटवर प्रचंड गाजली, ज्यामुळे ती तरुणांमध्ये लोकप्रिय झाली. समरीनचे सोशल मीडियावरही मोठे चाहते आहेत.

आयपीएल 2026 दरम्यान समरीन आणि अर्शदीप यांच्यातील अफेअरच्या अफवांना जोर चढला. याची सुरुवात एका स्नॅपचॅट पोस्टने झाली, ज्यामध्ये अर्शदीपने एका पोस्टमध्ये एका मुलीचा हात पकडला होता. चाहत्यांनी तिच्या नेलपॉलिशवरुन अंदाज लावला की ती समरीन कौरचं आहे. यानंतर ती थेट अर्शदीपसोबत आयपीएलमध्ये ट्रॅव्हल करताना दिसली. ती अर्शदीपला प्रोत्सहान देण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित राहिलेली दिसली. समरीनचे वय हे 26 आहे तर अर्शदीप सिंगचे वय हे 27 आहे. या दोघांमध्ये फक्त एका वर्षाचे अंतर आहे.

अर्शदीप सिंगच्या आधी, समरीन कौरचे नाव देशातील सुप्रसिद्ध यूट्यूबर, आशिष चंचलानीमुळेही चर्चेत आले होते. हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते आणि सुमारे तीन वर्षांपूर्वी, ते मुंबईत ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’च्या स्क्रीनिंगमध्येही एकत्र दिसले होते. त्यावेळी दोघांनीही या अफवा नाकारल्या होत्या आणि ते फक्त चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. नंतर, समरीनने स्पष्ट केले की वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्यातील संबंध तुटले असून आणि ते आता मित्र नाहीत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार