AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Kesari 2022 : अवकाळीचा फटका महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील आजचे सामने रद्द, उद्याच्या सामन्यांचं काय?

Maharashtra Kesari 2022 : साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील आजच्या दिवसाचे सामने रद्द (Maharashtra kesari wrestling tournament) झाले आहेत.

Maharashtra Kesari 2022 : अवकाळीचा फटका महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील आजचे सामने रद्द, उद्याच्या सामन्यांचं काय?
महाराष्ट्र केसरी
| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 10:46 PM
Share

मुंबई: साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील  आजचे सामने रद्द (Maharashtra kesari wrestling tournament) करण्यात आले आहेत. अवकाळी पावसाचा फटका या स्पर्धेला बसला आहे. महाराष्ट्रातील कुस्ती पैलवान आणि कुस्ती प्रेमींना ( wrestling fans) ही स्पर्धा कधी होणार? याची उत्सुक्ता असते. पण पावसाने आजच्या आनंदावर पाणी फिरवलं आहे. कोरोना व्हायरसमुळे (Corona virus) तब्बल दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी लायटिंगची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ही लायटिंग व्यवस्था कोसळल्याचं फोटोंमधून दिसत आहे. बऱ्याच कालावधीनंतर होत असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील आजचे सामने रद्द झाल्याने कुस्ती प्रेमींचा हिरमोड झाला आहे. मंगळवारी सायंकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्‍या हस्‍ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले.

राष्ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार आणि कुस्‍तीगीर परिषदेचे अध्‍यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्या प्रयत्नामुळे तब्‍बल 61 वर्षांनंतर महाराष्‍ट्र केसरीचे यजमानपद साताऱ्याला मिळाले आहे. पाच दिवस चालणाऱ्या महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेत विविध वजनी गटात कुस्‍त्‍या सुरु आहेत.

उद्या होणार महाराष्ट्र केसरीचे सामने सर्व कुस्तिगीर, प्रशिक्षक व जिल्हा तालीम संघाचे टीम मॅनेजर यांना कळवण्यात येते कि आज सायंकाळी ८ एप्रिल रोजी अवकाळी पावसामुळे स्थगित झालेल्या महाराष्ट्र केसरी व वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा उद्या ९ एप्रिल शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून चालू होतील .

महिला व पुरुषांसाठी स्‍वतंत्र बैठक व्‍यवस्‍था

महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी मातीचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत.  तर गादी प्रकारातील आखाडे सुध्दा तयार करण्‍यात आले आहे. तयार करण्यात आलेल्या कुस्ती आखाड्यांमुळे सातारकरांना दोन सत्रात कुस्तीची रंगत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे एकाचवेळी 55 हजार प्रेक्षक एकाचं वेळी कु्स्ती पाहू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी अधिक गर्दी होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.