AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND | सिडनी कसोटीत टीम इंडिया कांगारुंवर वरचढ ठरणार, ‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलला विश्वास

टीम इंडिया तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरेल, अशा विश्वास ख्रिस गेलने व्यक्त केला आहे.

AUS vs IND | सिडनी कसोटीत टीम इंडिया कांगारुंवर वरचढ ठरणार, 'यूनिवर्स बॉस' ख्रिस गेलला विश्वास
यूनिव्हर्स बॉस ख्रिस गेल
| Updated on: Jan 04, 2021 | 6:12 PM
Share

मुंबई : ऑस्ट्रेलियावरोधात लाजीरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने (India vs Australia) दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवला. यासह टीम इंडियाने कसोटी मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीत बोलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर शानदार कामगिरी केली. टीम इंडियाचा हा खेळ युनिव्हर्स बॉस गोलंदाजांचा कर्दनकाळ ख्रिस गेलला (Chris Gayle) आवडला आहे. टीम इंडिया सिडनी (Sydney) कसोटीत कांगारुंवर वरचढ ठरेल, अशा विश्वास गेलने व्यक्त केला आहे. (aus vs ind test series sydney test match team india will dominate australia believes chris gayle)

सिडनीची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल

“सिडनीची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली आहे. यामुळे टीम इंडियाच्या फिरकीपटूंना या खेळपट्टीकडून मदत मिळेल. त्यामुळे टीम इंडिया या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरेल”, असा विश्वास गेलने व्यक्त केला. गेल टाईम्स ऑफ इंडियाशी बोलत होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा या जोडीने एकूण 8 विकेट्स घेतल्या. तसेच फंलदाजांनाही ही खेळपट्टी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर पहिल्या डावात सरासरी 317 धावा होतात. या मैदानात 705 ही सर्वाधिक धावसंख्या आहे. विशेष म्हणजे ही धावसंख्या टीम इंडियानेच केली आहे. टीम इंडियाने ही कामगिरी 2003-04 च्या दौऱ्यावर केली होती. तेव्हा सचिन तेंडुलकरने नाबाद 241 तर व्ही व्ही एस लक्ष्मणने 178 धावा केल्या होत्या.

टीम इंडियाची तगडी बॅटिंग लाईनअप

कसोटी मालिकेत हिटमॅन रोहित शर्माचं पुनरागन झालं आहे. त्यामुळे टीम इंडियाला मजबूती मिळाली आहे. टीम इंडियाकडे शेवटपर्यंत बॅटिंगमध्ये खोली आहे. पहिल्या सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला. त्यानंतर नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आली. या खेळाडूंनी चोखपणे आपली भूमिका पार पाडली. “टीम इंडियाचे अनुभवी खेळाडू खेळत नाहीत. अशावेळी नवख्या खेळाडूंनी त्यांची जागा घेणं, आणि विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावणं ही टीम इंडियासाठी अभिमानाची बाब आहे”, असं गेलने नमूद केलं.

गेलकडून रहाणेचं कौतुक

अजिंक्य रहाणेने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटीत शानदार विजय मिळवून दिला. “रहाणेची कर्णधार म्हणून चांगली कामगिरी राहिली आहे. त्याने कसोटीमध्ये आतापर्यंत 3 वेळा टीम इंडियाचे नेतृत्व केलं आहे. या तीनही वेळा टीम इंडियाचा विजय झाला आहे. हे टीम इंडियासाठी चांगले संकेत आहेत. रहाणे एक मजबूत फलंदाज आहे. तो शांत स्वभावाचा आहे. तो नेतृत्व करण्यास पात्र आहे. रहाणे नेहमी पुढे येत नेतृत्व करतो”, अशा शब्दात गेलने रहाणेचं कौतुक केलं.

संबंधित बातम्या :

Australia vs India 3rd test | मिशन ‘अजिंक्य’, सिडनी कसोटीत रहाणेला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मास्टरप्लॅन

Sydney Test | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय, स्टेडियममध्ये मोजक्याच प्रेक्षकांना प्रवेश

Rohit Sharma | हिटमॅन रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसऱ्या कसोटीत विक्रमाची संधी

(aus vs ind test series sydney test match team india will dominate australia believes chris gayle)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.