Australia vs India, 3rd Test : शुभमन गिल-रोहित शर्मा जोडीची अर्धशतकी भागीदारी, 10 वर्षांनी अद्भूत कामगिरी

रोहित शर्मा आणि शुभमन गिल या जोडीने 70 धावांची सलामी भागीदारी केली.

Australia vs India, 3rd Test : शुभमन गिल-रोहित शर्मा जोडीची अर्धशतकी भागीदारी, 10 वर्षांनी अद्भूत कामगिरी
रोहित शर्मा आणि शुभमन गिल जोडीची सलामी अर्धशतकी भागीदारी

सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 3rd Test) यांच्यातील तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसखेर 2 विकेट्स गमावून 96 धावा केल्या. खेळ संपला तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणे चेतेश्वर पुजारा नाबाद होते. टीम इंडियाच्या पहिल्या डावाची शानदार सुरुवात झाली. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) या सलामी जोडीने 70 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह टीम इंडियाला मोठ्या काळाने शानदार सुरुवात मिळाली. aus vs india 3rd test shubhaman gill and rohit sharma 50 runs opening partnership record)

गेल्या काही सामन्यांपासून टीम इंडियाचे सलामीवर अपयशी ठरत होते. या ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या 2 सामन्यातही सलामीवीर अपयशी ठरले. मात्र रोहित आणि शुभमन गिलने टीम इंडियाची निराशा केली नाही.या जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली. टीम इंडियाला तब्बल 13 डावांनंतर अर्धशतकी सलामी भागीदारी मिळाली. म्हणजेच 13 डावानंतर सलामी जोडीने अर्धशतकी किंवा त्यापेक्षा अधिक धावांची भागीदारी केली.

याआधी ऑक्टोबर 2019 मध्ये मयांक अग्रवाल आणि रोहित शर्माने 317 धावांची सलामी भागीदारी केली होती. ही कामगिरी विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेविरोधात केली होती. यानंतर 2020 मध्ये ख्राईस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरोधात मयंक आणि पृथ्वी या जोडीने 30 धावांची सलामी भागीदारी केली होती.

2 वर्षानंतर परदेशात सलामी अर्धशतकी भागीदारी

गिल आणि रोहितच्या या भागीदारीनिमित्ताने तब्बल 2 वर्षांनी परदेशात टीम इंडियाला सलामी अर्धशतकी भागीदारी करण्यात यश आले आहे. याआधी डिसेंबर 2018 मध्ये केएल राहुल आणि मुरली विजय या सलामी जोडीने अॅडिलेडमध्ये 63 धावांची भागीदारी केली होती.

आशियाबाहेर साडे चार वर्षानंतर मोठी भागीदारी

तब्बल साडे चार वर्षानंतर आशियाबाहेरील टीम इंडियासाठी सर्वात मोठी सलामी भागीदारी ठरली आहे. याआधी केएल राहुल आणि शिखर धवन या सलामी जोडीने वेस्टइंडिजमध्ये 87 धावांची भागादारी केली होती. जुलै 2016 मध्ये ही भागीदारी करण्यात आली होती.

तब्बल 10 वर्षानंतर…..

कसोटीमध्ये साधारणपणे संथ आणि सावकाश खेळ अपेक्षित असतो. मात्र युवा खेळाडू आक्रमक असतात. यामुळे अनेकदा फलंदाज फटकेबाजीच्या नादात कसोटीतही पहिली विकेट लवकर गमावतात. रोहित-शुभमन गिलने 20 पेक्षा अधिक ओव्हर्सचा सामना केला. या दोघांनी एकूण 27 ओव्हरपर्यंत विकेट टाकली नाही. त्यामुळे या जोडीने तब्बल 10 वर्षानंतर 20 किंवा त्यापेक्षा अधिक ओव्हर सलामी भागीदारी करण्याचा विक्रम केला. याआधी डिसेंबर 2010 मध्ये वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरने आफ्रिकेतील सेंच्युरियनमध्ये 29.3 ओव्हरपर्यंत सलामी भागादारी केली होती.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | जोरदार जाडेजा, दमदार सैनी, बुम बुम बुमराह, गोलंदाजांनी कांगारुंना तंगवलं

Aus vs Ind 3rd Test | रवींद्र जाडेजाचा अचूक थ्रो, स्टीव्ह स्मिथ रन आऊट

(aus vs india 3rd test shubhaman gill and rohit sharma 50 runs opening partnership record)

Published On - 2:32 pm, Fri, 8 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI