बुमराहने मॅच आणली, उमेश यादवने घालवली!

India vs Australia 1st T20 : विशाखापट्टणम : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 126 धावा केल्या होत्या. भारताचे हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. हा सामना …

बुमराहने मॅच आणली, उमेश यादवने घालवली!

India vs Australia 1st T20 : विशाखापट्टणम : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बाद 126 धावा केल्या होत्या. भारताचे हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. विशाखापट्टणमच्या वाय एस राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात आला.

शेवटच्या 2 षटकात ऑस्ट्रेलियाला 16 धावांची गरज होती. जसप्रित बुमराहने जबरदस्त गोलंदाजी करत 19 व्या षटकात केवळ दोन धावा देत दोन विकेट घेतल्या. त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला 6 चेंडूत 14 धावांची गरज होती. मात्र उमेश यादवने सपशेल ढिसाळ गोलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 6 चेंडूत 14 धावा करणं शक्य झालं. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक 56 धावा केल्या. तर मार्कस स्टोयनिसने 1, अरोन फिंचने 0, नॅथन कल्टर नाईलने 4, पीटर हँड्सकोंबने 13, अॅश्टन टर्नरने 2 आणि डार्सी शॉर्टने 37 धावा काढल्या. भारताकडून जसप्रित बुमराह, युजवेंद्र चहल आणि कृणाल पंड्याने एक-एक विकेट घेतली.

त्याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुलने सर्वाधिक 50 धावा केल्या. राहुल वगळता अन्य फलंदाजाला मैदानावर टिकून राहता आलं नाही. रोहित शर्मा 5, कर्णधार विराट कोहली 23, ऋषभ पंत 3, दिनेश कार्तिक 0, कृणाल पंड्या 1, उमेश यादव ने 2 धावा काढल्या. तर महेंद्र सिंह धोनी 29 धावावर नाबाद राहिला. मधली फळी सपशेल ढेपाळल्यामुळे, भारताला केवळ 126 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कल्टर नाईलने 3, पॅट कमिन्स, जेसन बेहरनडोर्फ आणि एडम झाम्पाने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *