AUS vs IND : टीम इंडिया टी 20I सीरिजसाठी सज्ज, पहिला सामना किती वाजता?
Australia Women vs India Women 1st T20I : वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेनंतर आता क्रिकेट चाहत्यांना 15 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.

India women vs australia womenImage Credit source: PTI
वर्ल्ड चॅम्पियन्स वूमन्स टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. टी 20i आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहे. भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात रविवार 15 फेब्रुवारीपासून होणार आहे. उभयसंघात 15 फेब्रुवारीपासून टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघातील पहिला टी 20i सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
