Mohsin Naqvi : मोहसीन नक्वींना हट्ट भोवणार, सोडावं लागणार पद ? BCCI ॲक्शन मोडमध्ये आल्याने वाढणार अडचणी

आशिया कप जिंकून अनेक महिने झाले तरीही भारतीय संघाला अद्यापही विजेतेपदाची ट्रॉफी मिळालेली नाही. याला कारण म्हणजे मोहसीन नक्वी. आपल्या हातूनच भारतीय खेळाडूंना ट्रॉफी घ्यावी लागेल, अशी अडेलटतट्टू भूमिका घेणाऱ्या मोहसनी नक्वींचे कारनामे सर्वांनाच माहीत आहेत. मात्र आता ICC च्या बैठकीत BCCI हा मुद्दा प्रामुख्याने मांडणार असून नक्वीना घेरण्याच संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे नक्वी यांची खुर्ची धोक्यात आली असून त्यांच्या पदावरही टाच येऊ शकते.

Mohsin Naqvi : मोहसीन नक्वींना हट्ट भोवणार, सोडावं लागणार पद ? BCCI ॲक्शन मोडमध्ये आल्याने वाढणार अडचणी
चॅम्पियन्स ट्रॉफी न देणं नोहसीन नक्वींना भोवणार?
Image Credit source: social media
| Updated on: Nov 07, 2025 | 10:39 AM

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस दुबईमध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ( ICC Champions Trophy 2025) चे विजेतेपद पटकावले. मात्र असे असले तरीही विजेत्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी अद्यापही मिळालेली नाही. 28 सप्टेंबर 2025 ला झालेल्या अंतिम सामन्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पाकिस्ताने क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातून विजेतेपजदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. नक्वी हे एशियन क्रिकेट काऊन्सिलचेही प्रमुख आहेत.

मात्र भारतीय संघाला आपल्या हातूनच ट्रॉफी देण्यावर नक्वी ठाम होते. तिथे मैदानात ते बराच वेळ उभे होते, पण भारतीय खेळाडू काही पुढे आले नाहीतच. अखेर बारच काळ झाल्यानंतर नक्वी तिथून निघून गेले, पण जाताना ते चॅम्पियन्स ट्रॉफीसुद्धा सोबत घेऊन गेले. या मुद्यावरून अनेक वाद, चर्चा झाल्या, पण नक्वी यांनी त्यांचा हट्ट काही सोडला नाही. या घटनेला आत जवळपास दीड महीना होत आला असून आता बीसीसीायने कठोर पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे.

BCCI ॲक्शन मोडमध्ये

एका रिपोर्टनुसार, या आठवड्यात दुबईमध्ये आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषद बोर्डाची (ICC) बैठक होणार असून आशिया कप दरम्यानचे वर्तन आणि पाकिस्तानचे गृहमंत्री म्हणून नक्वी यांची असलेली दुहेरी भूमिका, याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रश्न उपस्थित करणार आहे. नक्वी यांनी आयसीसीच्या ऑपरेशनल नियमांचे उल्लंघन केले आहे असा बीसीसीआयचा आरोप आहे.

IND vs PAK Final, Mohsin Naqvi : निर्लज्जपणाची हद्द ! टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळाले मोहसीन नक्वी, पाकचा रडीचा डाव, BCCI ने सुनावलं

नक्वीविरोधात आरोपांची लिस्ट

टेलीकॉम एशिया स्पोर्ट्सच्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की बीसीसीआयने नक्वी यांच्याविरोधात आरोपांची एक लिस्ट तयार केली आहे. नक्वी यांच्या सार्वजनिक आणि क्रीडा अशा दोन्ही पदांवर काम करण्याच्या त्यांच्या पात्रतेला आव्हान देण्याचा बीसीसीआयचा मानस आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढंच नव्हे तर बीसीसआयला आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचाही (ACB) पाठिंबा मिळणार असल्याचे समजते. नुकत्याच झालेल्या हल्ल्यंमध्ये अफगाणिस्तानचे तीन क्रिकेटपटू ठा झाले होते, त्यानंतर पाकिस्तान व अफगाणिस्तानमधील संबंध अत्यंत बिघडलेले आहेत. या हल्ल्यांचा निषेध करत अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या तिरंगी लढतीतूनही माघार घेतली होती.

Mohsin Naqvi : PCB चीफचा पाकिस्तानातच अपमान, मोहसीन नकवींची खुर्ची जाणार ?

आयएएनएसच्या दुसऱ्या एका अहवालातही अशाच प्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे. “सर्व बोर्ड प्रमुख शुक्रवारी आयसीसी बोर्डाच्या बैठकीत भेटतील आणि अद्यापही प्रलंबित असलेला आशिया कप ट्रॉफी हस्तांतरणाचा मुद्दा, बीसीसीआय उपस्थित करणार आहे,” असे वृत्तसंस्थेने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले. एसीसीला औपचारिक पत्र लिहूनही आतापर्यंत ट्रॉफी हस्तांतरणावर काहीही तोडगा निघालेला नाही, त्यामुळेच आता बीसीसीआयकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे.

आयसीसीच्या तिमाही बैठकींमध्ये ट्रॉफी हस्तांतरणातील विलंबाची तक्रार उपस्थित करण्याची (बीसीसीआय) योजना आखत आहे, असे संकेत 1 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिले होते.