Breaking News : IPL फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर मोठा धमाका; आवाज होताच धावपळ; नेमकं काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील आयपीएल 2025 चा अंतिम सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र आजच्या सामन्यासाठी लाखो लोकांची गर्दी होण्यापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मोठा धमाका झाला.

आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यादरम्यान आयपीएल 2025 चा अंतिम सामना रंगणार आहे. मात्र आज संध्याकाळी हा सामना सुरू होण्यापूर्वीच स्टेडियमबाहेर ए मोठा धमाका झाला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्या स्टेडियमजवळच्या फूटपाथवर अन्न आणि पेय विकणाऱ्या लोकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आज सकाळी हा मोठा अपघात झाला खरा, पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या स्फोटामुळे स्टेडियमच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या भीतीचे वातावरण आहे.
आरसीबी वि. पंजाब किंग्समधील हा अंतिम सामना पाहण्यासाठी आज देश-विदेशातील हजारो-लाखो लोकं नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये येणार आहेत. मात्र असे असतानाही स्टेडियमच्या बाहेर असलेल्या फूटपाथवर अन्न आणि पेये विकणाऱ्या लोकांचा निष्काळजीपणा नडला आणि गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. ही दुर्घटना सकाळी घडली त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. पण दुपारपासूनच लोक स्टेडियममध्ये येण्यास सुरूवात होईल, तेव्हा हा स्फोट झाला असता तर काय गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, हा विचारच थरकाप उडवणारा आहे.
ऑपरेशन सिंदूर थीमवर होणार लाईट शो
दरम्यान आजच्या IPL समारोप समारंभासाठी बीसीसीआयने एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या भव्य यशाबद्दल बीसीसीआयद्वारे सैन्याच्या सन्मानार्थ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात भारतीय गायक एका खास लष्करी बँडसह देशभक्तीपर गाणी गातील. समारोप समारंभ देखील खूप खास असणार आहे. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन भारतीय सशस्त्र दलांना अद्भुत आदरांजली अर्पण करतील. त्यांच्या सादरीकरणातून ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या शूर सैनिकांचा सन्मान केला जाईल आणि पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.
BRTS बसेस आणि मेट्रोसाठी विशेष व्यवस्था
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यामुळे बीआरटीएस बसेस आणि मेट्रोसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून बीआरटीएस बसेस आणि मेट्रो रात्री 12.30वाजेपर्यंत धावणार आहेत. मेट्रो 2 कॉरिडॉरमध्ये एकूण 26 गाड्या चालवल्या जातील. तसेच, सिटी बसेसबद्दल सांगायचं झालं तर आज 100 हून अधिक सिटी बसेस चालवल्या जातील.
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी व्हीव्हीआयपींसह लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने, स्टेडियमभोवतीचे रस्ते दुपारी 2 ते 12 वाजेपर्यंत बंद राहतील. पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.
