
बॉबी डार्लिंग हे नाव बॉलिवूडमध्ये सर्वांनाच परिचित आहे. त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ट्रान्स अभिनेत्री म्हणून बॉबी डार्लिंग यांना बॉलिवूडमध्ये विशेष ओळख मिळाली. नुकताच बॉबी यांनी असा खुलासा केला, जो ऐकून सर्वजण थक्क झाले.
कोण आहे तो क्रिकेटपटू?
बॉबी डार्लिंग यांनी सांगितलं की, त्यांनी एका माजी क्रिकेटरसोबत ‘वन नाईट स्टँड’ केला. होय, ‘बॉलिवूड ठिकाणा’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी यांनी या क्रिकेटरचं नावही उघड केलं. सोशल मीडियावर ही मुलाखत प्रचंड व्हायरल होत आहे. बॉबी यांनी ज्या माजी भारतीय क्रिकेटरचं नाव घेतलं, ते दुसरं कोणी नसून मुनाफ पटेल होते. मुलाखतीत बॉबी म्हणाल्या, “त्यावेळी आम्ही मित्र होतो आणि एका क्लबमध्ये भेटलो होतो. आम्ही एकत्र क्लबिंग आणि पार्टी केली. त्या वेळी लोकांनी आम्हाला एकत्र पाहिलं आणि कोणाच्या तरी तोंडून असं निघालं की, मी मुनाफ पटेलसोबत पार्टी केली आणि त्यांना भेटले.”
वाचा: स्वत:ची वेळ आली तेव्हा घाबरला! ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर मसूद अजहर पाकिस्तानातून गायब, कुठे पळाला?
लोकांनी कदाचित त्यावेळी याचा खूप चुकीचा अर्थ काढला असेल. बॉबी यांनी मुलाखतीत सांगितलं की, त्यावेळी त्यांची प्रतिमा फ्लर्टी स्वभावाची होती. त्या म्हणाल्या, “मी कधीच असं म्हणणार नाही की आमचं नातं होतं, पण माझ्याकडून थोडं भावनिक बंधन निर्माण झालं होतं. जेव्हा लोक एकमेकांना भेटतात, तेव्हा आधी भावनिक जवळीक निर्माण होते आणि मग प्रेम होतं.”
नातं तुटलं?
पुढे बॉबी म्हणाल्या, “प्रेम होतं, पण त्याला मी काय म्हणू शकेन, कदाचित ‘वन नाईट स्टँड'” मात्र, बॉबी यांच्या या मुलाखतीवर मुनाफ पटेल यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बॉबी डार्लिंग म्हणाल्या की, त्यांनी याबाबत मीडियाला सांगितलं होतं, त्यामुळे त्यांचं नातं तुटलं. मुनाफ यांनी बॉबी यांना सांगितलं की, यामुळे माझी खूप बदनामी होईल आणि इतर क्रिकेटर्स काय बोलतील.