उंची 6 फूट, रणजीमध्ये 400 विकेट्स, मात्र जाडेजाच्या चुकीचा ‘या’ बोलर्सला मोठा फटका

| Updated on: Feb 03, 2021 | 12:20 PM

पंकज सिंगने् रणजी क्रिकेटमध्ये 117 मॅचेसमध्ये तब्बल 400 विकेट्स घेतल्या. | Bowler Pankaj Singh Unlucky Rajasthan Cricketer

उंची 6 फूट, रणजीमध्ये 400 विकेट्स, मात्र जाडेजाच्या चुकीचा या बोलर्सला मोठा फटका
Pankaj Singh
Follow us on

नवी दिल्ली : राजस्थान टीमचा एक असा बोलर्स ज्याने आपल्या बोलिंगने रणजी क्रिकेटमध्ये भल्याभल्या बॅट्समनची झोप उडवली. रणजी क्रिकेटमध्ये 117 मॅचेसमध्ये त्याने तब्बल 400 विकेट्स घेतल्या. वेगवेगळ्या टीमच्या विरोधात त्याने अनेक वेळा 5 फलंदाजांना आऊट करण्याचा विक्रम केला. त्याच बोलर्सची म्हणजे राजस्थानच्या पंकज सिंगची (Pankaj Singh) कहाणी… आपल्या बोलिंगने अनेकांची झोप उडवणाऱ्या पंकजला मात्र आपल्या डेब्यू सामन्यामध्ये मात्र कमाल दाखवता आली नव्हती. पहिल्या मॅचमध्ये एकही विकेट न घेता आतापर्यंतचे सर्वाधिक रन्स देण्याचा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंद झाला. (Bowler Pankaj Singh Unlucky Rajasthan Cricketer)

6 फूट 4 इंचच्या पंकज सिंगने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 117 सामने खेळले आणि 472 बळी घेतले. त्याच्या उंचीमुळे आणि त्याच्या बाऊन्सरनी अनेक फलंदाज घायाळ व्हायचे. रणजी ट्रॉफीमध्ये 400 बळी घेणारा तो पहिला फास्टर बोलर्स आहे. त्याने 28 डावांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले. तसेच 17 वेगवेगळ्या संघांविरुद्ध पाच विकेट घेण्याचा विक्रम नोंदविला. 2018 मध्ये तो पंकज पाँडेचेरी संघाकडून खेळला. तो या संघाकडून दोन हंगाम खेळला. पहिल्या हंगामात त्याने संघासाठी सर्वाधिक 45 विकेट घेतल्या. त्याने लागोपाठ सहा सिझन आयपीएलही खेळला.

आयपीएलचे सर्व हंगाम तो फक्त राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला. मात्र आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलं. आता जयपूरच्या सवाई मान सिंग स्टेडियममध्ये पंकज सिंग आपली अ‌ॅकॅडमी चालवत आहे.

पंकज सिंगच्या नावावर नकोसा विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी पंकजला खूप कमी वेळा मिळाली. इंग्लंड दौऱ्यात मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यासाठी पंकज आतुर झाला होता. परंतु नशीबाने त्याला साथ दिली नाही. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये त्याला एकही विकेट्स न मिळवता त्याला 179 धावा खर्च कराव्या लागल्या. या मॅचमध्ये इयान बेलने 167 रन्स बनवले. पंकज सिंगच्या बोलिंगवर जडेजाने इयान बेलचा कॅच सोडला आणि बेल भारतासाठी धोक्याची घंटा ठरला.

डेब्यू सामन्यात एकही बळी न घेता पंकज सिंगचे नाव सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज म्हणून नोंद आहे. पंकज सिंगच्या नावावर हा नकोसा विश्वविक्रम आहे. पंकजला मँचेस्टर येथे दुसर्‍या कसोटीत खेळण्याची संधीही मिळाली. या सामन्यात त्याने जो रूट आणि जोस बटलरच्या विकेट मिळवल्या. पण भारत एका डावाने या ही सामन्यात पराभूत झाला. (Bowler Pankaj Singh Unlucky Rajasthan Cricketer)

हे ही वाचा :

वयात गोलमाल करुन खेळला, दणदणीत शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून दिला पण नंतर झाली ही शिक्षा….

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू गुपचूप बोहल्यावर

IND vs ENG : टीम इंडियाच्या Playing XI बाबत डोकेदुखी, इशांत-सिराजमध्ये मुकाबला, सुंदर-अक्षरमध्येही टक्कर