टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू गुपचूप बोहल्यावर

आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये जयदेव उनाडकटचा शानदार विवाह सोहळा संपन्न झाला. (Jaydev Unadkat marries Rini )

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू गुपचूप बोहल्यावर
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 9:44 AM

मुंबई : टीम इंडियाचा क्रिकेटपटू जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) विवाहबंधनात अडकला. गुजरातमधील रिसॉर्टमध्ये उनाडकटचा विवाह सोहळा पार पडला. जयदेव आणि गर्लफ्रेण्ड रिनीच्या लग्नाला मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती. (Team India Cricketer Jaydev Unadkat marries Rini in Gujarat)

आणंदमधील रिसॉर्टमध्ये शानदार विवाह सोहळा

आणंद शहरातील मधुबन रिसॉर्टमध्ये जयदेव उनाडकटचा शानदार विवाह सोहळा संपन्न झाला. जयदेव रिनीसोबत नेहमीच फोटो शेअर करत असतो, मात्र यावेळी दोघांपैकी कोणीही सोशल मीडियावरुन लग्नाचे फोटो शेअर केलेले नाहीत. लग्नाची तारीखही दोघांनी गुलदस्त्यात ठेवली होती. लग्न सोहळ्याला केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईकांची उपस्थिती होती.

सौराष्ट्र संघाला जिंकवून साखरपुडा

29 वर्षीय जयदेव उनाडकटची पत्नी रिनी व्यवसायाने वकील आहे. दोघं अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. 15 मार्च 2020 रोजी जयदेव-रिनीचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्याच्या दोन दिवस आधीच उनाडकटने रणजी स्पर्धेत सौराष्ट्र संघाला विजयी केलं होतं.

लग्नाच्या दोन दिवस आधीपासूनच जयदेव आणि रिनीचे कुटुंबीय आणंदमध्ये दाखल झाले. सोमवारी त्यांचा संगीत समारंभ आयोजित करण्यात आला होता. उनाडकटच्या मित्रांनी त्यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते.

साखरपुड्यातील फोटो :

View this post on Instagram

A post shared by Jaydev Unadkat (@jd_unadkat)

आयपीएलचा स्टार खेळाडू

जयदेव उनाडकट भारतीय क्रिकेट संघात दीर्घ काळ स्थान मिळवू शकला नाही. मात्र आयपीएलमध्ये तो स्टार खेळाडू आहे. 2010 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषकाचं कर्णधारपद त्याने भूषवलं होतं. वसिम अक्रमसारख्या दिग्गजांनीही त्याची तारीफ केली आहे.

पाच आयपीएल संघांमध्ये मुशाफिरी

2013 मध्ये जयदेवने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यावेळी तो संघातील सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला होता. 2014 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात गेला, तर 2016 मध्ये एक कोटी 60 लाखांची बोली लावत कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला विकत घेतले.  2017 तो पुणे सुपरजायंट्सच्या संघात सहभागी झाला, तर दहाव्या मोसमात त्याला हैदराबाद सनरायजर्सने खरेदी केले.

View this post on Instagram

A post shared by Jaydev Unadkat (@jd_unadkat)

संबंधित बातम्या :

विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

टीम इंडियाच्या Playing XI बाबत डोकेदुखी, इशांत-सिराजमध्ये मुकाबला, सुंदर-अक्षरमध्येही टक्कर

(Team India Cricketer Jaydev Unadkat marries Rini in Gujarat)

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणीची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.