AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयात गोलमाल करुन खेळला, दणदणीत शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून दिला पण नंतर झाली ही शिक्षा….

न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या अंडर 19 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मनजोतच्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला आठ गड्यांनी पराभूत केले. | Manoj Kalra

वयात गोलमाल करुन खेळला, दणदणीत शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून दिला पण नंतर झाली ही शिक्षा....
Manjot kalra
| Updated on: Feb 03, 2021 | 9:56 AM
Share

मुंबई : आजपासून बरोबर तीन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारताने चौथ्यांदा अंडर 19 ( Under 19 World Cup)  वर्ल्ड कप जिंकला होता. न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला  (ind Vs Aus) आठ गड्यांनी पराभूत केले. ही मॅच 3 फेब्रुवारी 2018 रोजी माउंट मौनगुनी येथे झाली होती. दणदणीत शतक ठोकून मनजोत कालरा (manoj kalra) हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला होता. परंतु मॅच संपल्यानंतर काही दिवसांनंतर मनोज कालराने त्याच्या वयात फेरफार केल्याचं समोर आलं होतं. (Manoj Kalra Century in under 19 World Cup Against Australia On 3 Feb)

वयात फेरफार केल्याने साहजिक त्याचं वय 19 वर्षाखालील असल्याचं त्याने भासवलं. यामुळे त्याला अंडर 19 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली. 2019 मध्ये दिल्ली पोलिसांनी मनजोतच्या आई वडिलांवर मनोजच्या वयात फेरफार केल्याचा आरोप ठेवला. यामुळे मनजोतला एका वर्षासाठी रणजी ट्रॉफी खेळता आली नाही.

विश्वचषकाचा अंतिम सामना

अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 217 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरादाखल भारताच्या मनजोत कालराने दणदणीत शकत ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. या खेळीमध्ये त्याने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मनजोत पाटवा बॅटसमन ठरला. भारताने ही मॅच 39 व्या ओव्हरमध्येच जिंकली.

बीसीसीआयच्या चौकशीत निर्दोष, पण दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात अडकला…

अंडर 19 चा अंतिम सामना झाल्याच्या एका वर्षाने मनजोतने विश्वचषक खेळण्यासाठी त्याच्या वयात फेरबदल करुन घेतल्याचा त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. चौफेर आरोपानंतर बीसीसीआयने त्याची चौकशी केली. बीसीसीआयच्या चौकशीत तो निर्दोष सुटला परंतु दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात तो अडकला. मनजोतच्या आई वडिलांनी त्याचं वय कागदोपत्री एक वर्ष कमी दाखवलं होतं.

या झालेल्या प्रकारानंतर बीसीसीआयने त्याच्यावर एक वर्ष रणजी खेळण्याची बंदी आणली होती. अंडर 19 चा कोच राहुल द्रविडने या पार्श्वभूमीवर तडक भूमिका घेत हा गंभीर गुन्हा असल्याचं म्हटलं होतं.

(Manoj Kalra Century in under 19 World Cup Against Australia On 3 Feb)

हे ही वाचा :

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू गुपचूप बोहल्यावर

IND vs ENG : टीम इंडियाच्या Playing XI बाबत डोकेदुखी, इशांत-सिराजमध्ये मुकाबला, सुंदर-अक्षरमध्येही टक्कर

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....