
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार आणि संघातील स्टार खेळाडू स्मृती मानधना (Smriti Mandhana) ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमुळे इंटरनेटवर खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने संगीतकार पलाश मुच्छलशी (Palash Muchhal) लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली होती, त्याचनंतर आता स्मृतीची ही पोस्ट समोर आली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहीलेल्या मेसेजने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
‘(माझ्यासाठी) शांततेचा अर्थ मौन नाही, तर नियंत्रण (control) आहे…’ असं स्मृतीने तिच्या पोस्टवर लिहीलं आहे. ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे. अवघ्या काही तासांतच या पोस्टवर 10 लाखांहून अधिक लाईक्स आलेच, तसशाच काही कमेंट्सही लोकांनी केल्या आहेत. खरंतर स्मृतीची ही पोस्ट म्हणजे एका स्मार्टफोन कंपनीच्या पेड प्रमोशनचा भाग होती, पण अनेक लोकांनी या पोस्टचा तिच्या खासगी जीवनाशी संबंध जोडण्यास सुरूवात केली.
लग्न मोडल्यावर पहिली प्रतिक्रिया
7 डिसेंबर, रविवारी दुपारी स्मृती मानधना हिने एक निवदेन जारी केलं होतं, ज्यामध्ये तिने चाहत्यांना प्रायव्हसी जपण्याचे आवाहन केले होते. मी माझ्या आयुष्याच्या अत्यंत खासगी आणि संवेदनशील काळातून जात आहे, त्यामुळे शांतीची गरज आहे. तिच्या लग्नाबद्दल सुरू असलेल्या चर्चांदरम्यानच स्मृतीचं हे विधान समोर आलं. 23 नोव्हेंबरला स्मृती -पलाशचं होणारं लग्न हे (2025) या वर्षातील हाय-प्रोफाईल सेलिब्रिटी लग्नसोहळ्यांपैकी एकं मानलं जात होतं.
साखरपुडा ते लग्न
या वर्षात त्यांचं नातं खूप चर्चेत होतं. भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकल्यावर नंतर त्याच डीवाय पाटील स्टेडियममध्ये पलाश मुच्छलने मानधनाला प्रपोज करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिनेही होकार दिला. 23 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांचं लग्न होणार होतं, सांगलीत मेहीद, संगीत, हळ असे समारंभही झाले. मात्र लग्नाच्या दिवशी सकाळीच परिस्थिती अचानक बदलली. स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्यानंतर थोड्याच वेळात, पलाश मुच्छल देखील तणाव आणि थकव्यामुळे रुग्णालयात गेला. दोन्ही कुटुंबे अस्वस्थ झाली आणि या परिस्थितीत, लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
पलाशबद्दल पसरला अफवा
लग्न काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा सुरू झाल्या, अफवांचं पेव फुटलं. काही युजर्सनी मुच्छलवर फसवणुकीचे गंभीर आरोप केले. मात्र हे पूर्णपणे खोटं आणि हानिकारक असल्याचे सांगत पलाश मुच्छलच्या कुटुंबाने हे दावे फेटाळून लावले.त्यानंतर रविवारी आधी स्मृती माधनना हिने लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली. तर त्यानंतर काही काळाने पलाश मुच्छल यानेही एक निवेदन जारी केले. मी आयुष्यात मूव्ह ऑन करण्याचा आणइ वैयक्तिक नात्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने नमूद केलं होतं. तसंच माझ्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची खोटा, बदनामीकारक कंटेंट पोस्ट करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पलाशने दिला.
ही परिस्थिती शांत करण्याच्या प्रयत्नात, मानधना, मुच्छल या दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं, तसेच लग्नाच्या तयारीचे, प्रपोजल सह एकमेकांसोबतचे सर्व फोटो सोशल मीडिया अकाऊंटवरूनही हटवले.
स्मृतीचा क्रिकेटवर फोकस
लग्न मोडल्याचं जाहीर केल्यावर स्मृतीने क्रिकेटवर पूर्णपणे फोकस केला. ती प्रॅक्टिसासाठी क्रिकेटच्या मैदानात परतल्याचा फोटो थोड्याच वेळात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तिच्या या निर्णयाचे चाहत्यांनी समर्थन केलं असून अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला. तिची मैत्रीण जेमिमा रॉड्रिग्जनेही मानधनाला साथ दिली आणि महिला बिग बॅश लीगमधून माघार घेतली आणि तिच्यासोबत भारतातच राहिली.