Smriti Mandhana-Palash Muchhal : स्मृतीने लग्न रद्द करताच पलाश मुच्छल याचाही मोठा निर्णय; त्या कृतीमुळे अखेर सगळंच संपलं
Palash Muchhal Smriti Mandhana Wedding Cancelled : स्मृती मानधना हिने काल एक पोस्ट लग्न कॅन्सल झाल्याची घोषणा केली. त्यानंतर 24 तासांच्या आतच संगीतकार पलाश मुच्छलने एक मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) याचं लग्न मोडलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा सुरू होत्या, विविध अटकळीही बांधल्या जात होत्या. 23 नोव्हेंबरला लग्न पुढे ढकलण्यात आल्यावर, काल (7 डिसेंबरला) लग्न होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र कालच दुपारी स्मृती मानधना हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर करत हे लग्न मोडल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर काही वेळाने पलाश यानेही त्याच्या अकाऊंटवर लग्न मोडल्याचं जाहीर केलं. तसेच दोघांनीही इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केलं. यामुळे मोठी खळबळ माजली.
23 तारखेला होणार लग्न पुढे ढकलल्याचं जाहीर केल्यावर काही दिवसांनीच स्मृतीने लग्नाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते.आणि काल तिने लग्न मोडल्याचं स्टेटमेंटही दिलं. त्यानतंर लगेच पलाशनेही निर्णय जाहीर केला तसेच प्रपोजल व्हिडीओ आणि त्याने वर्ल्ड कपचे सर्व फोटोही डिलीट केले, त्यामध्ये स्मृतीच्या नावाचा टॅटू यांचा समावेश होता. मात्र असं असलं तरी स्मृतीच्या वाढदिवसाचा एक फोटो त्याच्या अकाउंटवर आहे. तर स्मृती मानधना हिने तिच्या फीडमधून पलाशसोबतच्या सर्व पोस्ट पूर्णपणे काढून टाकल्या आहेत.तसेच त्याची बहीण पलक मुच्छल हिलाही तिने अनफॉलो केलं आहे.
पलाश मुच्छलने उचललं मोठं पाऊल
स्मृती मानधनासोबतचे लग्न मोडल्याचे सार्वजनिक झाल्यानंतर पलाश मुच्छलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून लग्नापूर्वीचा प्रपोजल व्हिडिओ डिलीट केला. हा तोच व्हिडिओ होता ज्यामध्ये पलाशने क्रिकेट स्टेडियममध्ये अतिशय रोमँटिक पद्धतीने स्मृतीला प्रपोज केले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्या मैदानावर भारतीय महिला संघाने वर्डकप जिंकला, तिथेच पलाशने स्मृतीला प्रपोज केलं होतं, मात्र आता तो व्हिडीओ पलाशच्या अकाऊंटवरून हटवण्यात आला आहे. काल त्याने हा व्हिडीओ डिलीट केला नव्हता, तेव्हा अनेकांनी त्याला ट्रोल करत, कमेंट्स करत आता तरी तो व्हिडीओ काढ भावा, अशा कमेंट्स केल्या होत्या.
नंतर पलाशने प्रपोजलचा हा व्हिडीओ हटवला. एवढंच नव्हे तर त्याने वर्ल्डकप सेलिब्रेशनचा एक व्हिडीओही काढून टाकला. हे पाहताच सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला, पण पलाशने अद्याप स्मृतीसोबतचे बरेच फोटो आणि पोस्ट डिलीट केलेले नाहीत. त्याच्या वाढदिवसाचा एक व्हिडीओ अजूनही त्याच्या वॉलवर आहे, ज्यात त्याच्यासोबत स्मृी ही देखील दिसत आहे.

हे लग्न रद्द करण्यात आलं आहे
काल स्मृतीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट लिहील लग्न मोडल्याचं जाहीर केलं होतं. ‘गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या खासगी आयुष्याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात आहेत आणि मला वाटतंय की यावेळी मी याबद्दल बोलणं खूप महत्त्वाचं आहे. मी अत्यंत खासगी व्यक्ती आहे आणि मला माझं आयुष्य असंच ठेवायचं आहे. परंतु मी हे स्पष्ट करू इच्छिते की लग्न रद्द करण्यात आलं आहे. मी हे प्रकरण इथेच संपवू इच्छिते आणि तुम्हा सर्वांनाही हेच करण्याची विनंती करते. कृपया दोन्ही कुटुंबांच्या खासगीपणाचा आदर करा. आम्हाला आमच्या गतीने पुढे जाण्यासाठी वेळ द्या’, असं तिने पोस्टमध्ये नमूद केलं होतं.

त्यानतंर पलाशनेही एक पोस्ट लिहीत वैयक्तिक नात्यातून माघार घेत असल्याचं सांगितलं होतं. स्मृती पलाश यांचं सांगलीत 23 नोव्हेंबरला लग्न होणार होतं, मात्र तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यावर ते पुढे ढकलण्यात आलं होतं. त्यानंतर पलाशवर अनेक आरोप झाले, त्याचे काही मुलींसोबतचे चॅटसही लीक झाले. त्याने स्मृतीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.
