भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी मंत्र्यांच्या चीड आणणाऱ्या प्रतिक्रिया

विश्वचषक 2019 च्या सेमीफायनल सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतासह जगभरात अनेक क्रिकेट रसिकांची निराशा झाली. मात्र, न्यूझीलंडने केलेल्या या भारताचा पाकिस्तानच्या मंत्र्यांना आनंद झाल्याचे दिसत आहे.

भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी मंत्र्यांच्या चीड आणणाऱ्या प्रतिक्रिया

मुंबई: विश्वचषक 2019 च्या सेमीफायनल सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतासह जगभरात अनेक क्रिकेट रसिकांची निराशा झाली. मात्र, न्यूझीलंडने केलेल्या या भारताचा पाकिस्तानच्या मंत्र्यांना आनंद झाल्याचे दिसत आहे. या निमित्ताने पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून भारतावर टीका करण्यात आली.

पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद हुसेन यांनी ट्वीट करत भारताच्या पराभवावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “पाकिस्तानचे नवे प्रेम न्यूझीलंड.”

पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी भारतीय संघाच्या पराभवानंतर ट्वीट करत न्यूझीलंडच्या संघाचे कौतूक करत अभिनंदन केले. गफूर म्हणाले, “न्यूझीलंडच्या संघाचे अभिनंदन. आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचतानाचा हा दिमाखदार विजय आहे. नैतिक मुल्यं असलेल्या न्यूझीलंड या देशाच्या संघात खिलाडूवृत्ती दिसली.”

दरम्यान, पाकिस्तानचा संघा विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलसाठी पात्र ठरला नव्हता. तर दुसरीकडे भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर जाऊन सेमीफायनलमध्ये पोहचला होता. मात्र, सेमीफायनलच्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारताला 18 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंड सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यामुळे आता फायनलमध्ये काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनीही भारतीय क्रिकेट संघाला ट्रोल केलं आहे.

भारतीय खेळाडूंवर पाकिस्तानमध्ये अनेक मीम्सही तयार झाले आहेत.

भारताला ट्रोल करताना काहींनी तर हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्याही फोटोचा उपयोग केला. यात धोनीला धावबाद होताना दाखवण्यात आले आहे. तसेच धोनी आणि विंग कमांडर पाकिस्तानची सीमा पार करण्यात अपयशी ठरल्याचा दावा करण्यात आला.

पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकवर बनवण्यात आलेला चित्रपट ‘उरी’मधील ‘हाऊ इज द जोश’ या डायलॉगचा आधार घेऊन भारताची चेष्टा करण्यात आली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *