AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022: आज तीन गोल्ड जिंकून पदकतालिकेत आणखी वर जाण्याची भारताला संधी

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज शेवटचा दिवस आहे. 28 जुलैपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगच्या खेळातून भारताने पदकांची लूट केली.

CWG 2022: आज तीन गोल्ड जिंकून पदकतालिकेत आणखी वर जाण्याची भारताला संधी
पीव्ही सिंधूImage Credit source: social
| Updated on: Aug 08, 2022 | 10:22 AM
Share

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज शेवटचा दिवस आहे. 28 जुलैपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगच्या खेळातून भारताने पदकांची लूट केली. पदकतालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानी आहे. भारताच्या पुढे न्यूझीलंड आहे. दोघांच्या सुवर्णपदकांमध्ये फक्ता एका मेडलच अंतर आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, त्यावर पदकतालिकेत भारताचं स्थान निश्चित होईल. भारत टॉप 5 मध्ये आहे. पण त्यात अजून एकास्थानाची सुधारणा करण्याची संधी आहे. बॅडमिंटन मध्ये भारताला आज तीन गोल्ड मेडल जिंकण्याची संधी आहे. महिला एकेरीत पी.व्ही.सिंधू, पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांची गोल्डवर नजर असेल. सिंधूचा सामना कॅनडाच्या मिशेल ली विरुद्ध होणार आहे. लक्ष्य सेनची लढत मलेशियाच्या एनजी त्झे योंग विरुद्ध होणार आहे. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी फायनल सामना खेळतील.

गोल्डची हुकलेली संधी सिंधू आज साधणार?

भारताच्या बॅडमिंटन संघाने आधीच तीन मेडल्स जिंकले आहेत. मिश्र दुहेरीत रौप्य मिळवलं आहे. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या सिंधुला अजून कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मिळवता आलेले नाही. 2018 सालच्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अंतिम फेरीत तिचा पराभव झाला होता. आज सुवर्णपदक जिंकण्याचा ती पुरेपूर प्रयत्न करेल. कारण मिश्र दुहेरीच्या फायनल मध्ये पराभूत झाल्यामुळे तिने आधीच संघाला निराश केलं आहे.

रविवारी जबरदस्त कामगिरी

भारतासाठी रविवार 7 ऑगस्ट हा दिवस बॉक्सिंग आणि ऍथलेटिक्सच्या दृष्टीने खूप चांगला होता. बॉक्सिंगमध्ये भारताने चार फायनलपैकी तीन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून आपले स्थान मजबूत केले. त्याचबरोबर अ‍ॅथलेटिक्समध्ये सर्वांना चकित करत तिहेरी उडीत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले. ऍथलेटिक्समध्ये रविवारी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण 4 पदके आली. टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक, तर हॉकीमधून कांस्य आणि क्रिकेटमधून रौप्यपदक मिळाले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.