AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CWG 2022, Lovlina Borgohain : ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिनाची तक्रार, क्रीडा मंत्रालयापासून BFI पर्यंत कारवाई, संपूर्ण प्रकरण वाचा…

लोव्हलिनाच्या या आरोपामुळे CWG 2022 समोर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि बॉक्सिंग फेडरेशनवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. क्रीडा मंत्रालयानं ट्विट करून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला हे प्रकरण त्वरित सोडवण्यास सांगितलंय.

CWG 2022, Lovlina Borgohain : ऑलिम्पिक पदक विजेती लोव्हलिनाची तक्रार, क्रीडा मंत्रालयापासून BFI पर्यंत कारवाई, संपूर्ण प्रकरण वाचा...
लव्हलिना बोरगोहेनImage Credit source: social
| Updated on: Jul 26, 2022 | 7:48 AM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रकुल 2022 चे दिवस जसजसे कमी होत चालले आहेत, तसतसं भारतीय खेळाडूंशी संबंधित वाद वाढत आहेत. याआधीही अ‍ॅथलेटिक्समध्ये डोपिंगची काही प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे भारताला लाज वाटू लागली आहे. आता ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लव्हलिना बोरगोहेननं (Lovlina Borgohain) आपल्या प्रशिक्षकासोबत न जुळल्यानं तिला होणाऱ्या त्रासाबद्दल बोलून सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. लोव्हलिनाच्या आरोपांमुळे क्रीडा मंत्रालयापासून भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (BFI) आणि ऑलिम्पिक असोसिएशन ऑफ इंडिया (IOA) पर्यंत कारवाई करण्यात आली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या लोव्हलिनाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (CWG 2022) मध्येही पदकाची दावेदार मानले जात आहे. मात्र, सोमवारी 25 जुलै रोजी लोव्हलिनानं निवेदन जारी करून सर्वांनाच धक्का दिला. लव्हलिना म्हणाली की शेवटच्या क्षणी तिचे प्रशिक्षक वारंवार बदलले जात आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या तिचा प्रशिक्षक संध्या गुरुंग यांना आधी काढून टाकण्यात आले आणि नंतर शेवटच्या क्षणी समाविष्ट करण्यात आले. यामुळे तिच्या तयारीवर परिणाम होत आहे. यामुळे तिला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं लव्हलिनानं सांगितलं.

क्रीडा मंत्रालयाचं आयओएला आवाहन

लोव्हलिनाच्या या आरोपामुळे CWG 2022 समोर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि बॉक्सिंग फेडरेशनवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयानं ट्विट करून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला हे प्रकरण त्वरित सोडवण्यास सांगितलंय. MYAS खात्यावरून लोव्हलिनाचं ट्विट रिट्विट करण्यात आलं, ‘आम्ही भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला विनंती केली आहे की लोव्हलिना बोरगोहेनच्या प्रशिक्षकासाठी त्वरित मान्यता देण्याची व्यवस्था करावी.’

मंत्रालयाचं ट्विट

बीएफआयनं काय म्हटलंय?

यानंतर बॉक्सिंग फेडरेशननेही निवेदन जारी करून परिस्थिती आणि ताजी परिस्थिती स्पष्ट केली. बीएफआयने सांगितले की, आयओएच्या धोरणामुळे फेडरेशनकडे अधिक सपोर्ट स्टाफ पाठवण्याचा पर्याय नव्हता. महासंघान सांगितलं की, खेळाडूंच्या संख्येच्या केवळ 33 टक्के सपोर्ट स्टाफ पाठवण्याचा नियम आहे. त्यामुळे 12 बॉक्सर (8 पुरुष आणि 4 पुरुष) परंतु केवळ 4 सपोर्ट स्टाफ (प्रशिक्षकांसह) बर्मिंगहॅमला जाण्याचं ठरलं होतं.

कोचिंग स्टाफ

बॉक्सिंगमधील अनेक सामन्यांमुळे कोचिंग आणि सपोर्ट स्टाफची आवश्यकता वेगळी आहे.  सपोर्ट स्टाफची संख्या वाढवण्यात आली आहे. बीएफआयनं सांगितले की, आयओएला बीएफआयची भूमिका समजली आहे आणि म्हणूनच जास्तीत जास्त सपोर्ट स्टाफ पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. IOA च्या मदतीनं 12 बॉक्सर्सच्या संघातील सपोर्ट स्टाफची संख्या 4 वरून 8 करण्यात आली आहे.

लव्हलिनाच्या प्रशिक्षक संध्या गुरुंग यांच्या बाबतीत, फेडरेशनने एक अपडेट दिले आहे की तिला लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, “BFI सतत IOA सोबत काम करत आहे जेणेकरून संध्या गुरुंग बर्मिंगहॅममध्ये संघात सामील होऊ शकेल. तोपर्यंत त्यांना ईटीओ हॉटेलमध्ये वाहन आणि राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.