Rohit Sharma : रोहित शर्माकडून तिरंग्याचा अपमान ? सोशल मीडियावर फॅन्समध्ये जुंपली, कोण काय म्हणालं ?

Rohit Sharma Indian Flag Controversy : टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर इंडियन टीमसह संपूर्ण देशाने जल्लोष केला. रोहित शर्माचेही अनेकांनी भरभरून कौतुक केलं. पण आता रोहित शर्माने सोशल मीडियावर नवा प्रोफाईल फोटो लावला असून त्यामुळेच तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केल्याचा आरोप त्याच्यावर होत असून नवा वाद निर्माण झाला आहे.

Rohit Sharma : रोहित शर्माकडून तिरंग्याचा अपमान ? सोशल मीडियावर फॅन्समध्ये जुंपली, कोण काय म्हणालं ?
| Updated on: Jul 09, 2024 | 12:50 PM

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. टीम इंडियाचे T20 विश्वचषक 2024 जिंकून इतिहास रचला, त्यामुळे रोहित आणि टीमचे भरभरून कौतुक झालं. मात्र त्यानंतर लगेचच त्याने T20मधून निवृत्ती जाहीर केली. मायदेशी परतल्यानंतर मुंबईत झालेल्या व्हिक्टरी परेडमध्येही रोहितचा आनंद, जल्लोष दिसला, त्यामुळे तो सतत चर्चेतच आहे. पण आता तो पुन्हा चर्चेत आलाय, ते एका नव्या वादामुळे. रोहित शर्माने त्याच्या X (ट्विटर) या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या नव्या प्रोफाईल पिकमुळे हा नवा वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्याचा फोटो पाहताच तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला असून अनेकांनी त्याला तिरंग्याचा मान कसा राखायचा याबद्दल धडे द्यायला सुरूवात केली.

रोहितच्या प्रोफाईल पिकमुळे वाद का ?

8 जुलैच्या संध्याकाळी रोहित शर्माने X या सोशल मीडिया साइटवरील त्याच्या अकाऊंटवरील त्याचे प्रोफाइल फोटो बदलला. मात्र त्यामुळे अनेक जण त्याच्यावर रागावले आहेत. त्याच्या नव्या फोटोमुळे अनेक चाहते संतापले असून रोहितने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

खरंतर, त्याचा हा फोटो टी20 वर्ल्ड कप विजयानंतरचा आहे. या विजयानंतर बार्बाडोसमधील केंसिंग्टन ओव्हल मैदानावर रोहितने भारताचा ध्वज रोवला होता, त्याच क्षणाचा फोटो रोहितने शोशल मिडिया अकाऊंटवर प्रोफाईल पिक म्हणून सेट केला. क्रिकेट जगतात भारताचा दबदबा दर्शवणं हाच रोहितचा या फोटो पोस्ट करण्याचा उद्देश असावा असं दिसतंय. पण परदेशातील भूमीवर राष्ट्रीय ध्वज असा रोवणं हे चाहत्यांना मात्र रुचलं नाही आणि त्यामुळेच रोहितला टीकेचा सामना करावा लागत आहे.

 

पण खरा मुद्दा या फोटोमध्ये दिसणाऱ्या तिरंग्याचा होता. या फोटोत राष्ट्रध्वज जमिनीला स्पर्श करताना दिसत होता. तो मुद्दा उपस्थित करत चाहत्यानी ती चूक दाखवून दिली, तसेच काहींनी तर 1971 च्या राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा देखील उद्धृत केला. त्यानुसार, “ध्वजाचा जाणूनबुजून जमिनीला स्पर्श होता कामा नये किंवा तो पाण्यात पडू देऊ नये.”

काय म्हणाले सोशल मीडिया यूजर्स ?