धोनीचा सामना सुरु असताना चीयरलीडर्ससमोर असं कृत्य? पोलिसांना घ्यावी लागली दखल
आयपीएल 2025 स्पर्धेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आयपीएल स्पर्धेतल्या 62व्या सामन्यातील आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला होता. यावेळी अरूण जेटली मैदानात एका चाहत्याने चीयरलीडर्ससमोर विचित्र काही केलं.

आयपीएल स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. प्लेऑफमधील चार संघही ठरले आहेत. पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. पण सध्या सोशल मीडियावर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या सामन्याची चर्चा होत आहे. तसं पाहीलं तर हे दोन्ही संघ स्पर्धेतून आऊट झाले आहेत. अरूण जेटली मैदानात रंगलेल्या 62व्या सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. तेव्हा एका विचित्र प्रकाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एक चाहता उत्साहाच्या भरात चीयरलीडर्ससमोर विचित्र पद्धतीने वागत होता. यावेळी सुरक्षारक्षकांनी हस्तक्षेप केला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामना सुरु असताना दोन्ही संघांचे चाहते आपआपल्या संघाला प्रोत्साहन देत होते. पण तेव्हा एक चाहता अचानक आपल्या सीटवरून उठला आणि बाउंड्री लाईनजवळ गेला. तिथे चीयरलीडर्स डान्स करत होत्या.
उत्साहाच्या भरात चाहता त्यांच्या जवळ गेला. त्यांच्या मध्ये फक्त एका लोखंडी जाळीचं अंतर होतं. चाहत्या त्यांच्या समोर गेला आणि विचित्र पद्थीने डान्स करू लागला. त्याची कृती पाहून उपस्थित चाहत्यांना हसू अनावर झालं. पण सुरक्षारक्षकांना ही बाब काही रूचली नाही. त्यांनी तात्काळ त्या चाहत्याला थांबवलं. सुरक्षारक्षकांचा खाक्या पाहून त्या चाहत्याने तेथून पळ काढला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये अशा पद्धतीने वागणं काही योग्य मानलं जात नाही. आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत चाहत्यांकडून चांगल्या वर्तनाची अपेक्षा केली जाते. उत्साहासोबत नियमांचं पालन करणंही तितकंच गरजेच आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली. राजस्थान रॉयल्स 14 पैकी 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहून नवव्या स्थानावर राहिली. तर चेन्नई सुपर किंग्सनेही 14 पैकी 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. पण नेट रनरेट कमी असल्याने दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स पहिल्यांदाच गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिली आहे.
