IPL 2025 डेवॉल्ड ब्रेव्हिसने सीएसके सोडले आणि नवीन संघात सामील, नेमकं काय झालं वाचा
आयपीएल 2025 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास संपला आहे. गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानी समाधान मानावं लागलं आहे. पण शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केला आणि शेवट गोड केला. या सामन्यात डेवॉल्ड ब्रेव्हिसने चांगली कामगिरी केली होती. मात्र आता दुसऱ्या संघाची कास धरली आहे.

डेवॉल्ड ब्रेव्हिसला आयपीएल 2025 स्पर्धेतील मेगा लिलावात कोणत्याही संघाने रस दाखवला नव्हता. पण त्याचं नशिब इतकं जबरदस्त होतं की त्याला चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएलच्या मध्यात खेळण्याची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस याला ज्युनियर एबी डिव्हिलियर्स म्हणून ओळखलं जातं. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज गुर्जपनीत सिंग हंगामाच्या मध्यात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या जागी चेन्नई सुपर किंग्सने ब्रेव्हिसला घेतलं. ब्रेव्हिसने संधीचं सोनं केलं आणि आणि उल्लेखनीय कामगिरी केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात ब्रेव्हिसने धमाकेदार अर्धशतक झळकावले आणि संघाला शानदार विजय मिळवून दिला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ब्रेव्हिस शेवटी का होईना भाव खाल्ला हे महत्त्वाचं आहे. पण साखळी फेरीतच चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान संपुष्टात आले. पाच वेळा विजेता संघाला गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. आयपीएल स्पर्धा त्याच्या संघासाठी संपल्याने ब्रेव्हिसने टी20 ब्लास्टमध्ये भाग घेण्यासाठी लंडनमध्ये दाखल झाला आहे.
ब्रेव्हिस हॅम्पशायर संघात सामील
डेवॉल्ड ब्रेव्हिस या पर्वात हॅम्पशायरकडून खेळणार आहे. ही लीग 29 मे पासून सुरु होणार आहे. तसेच 30 मे रोजी हॅम्पशायरचा पहिला सामना एसेक्सविरुद्ध होणार आहे. डेवॉल्ड ब्रेव्हिसने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तो साउथहॅम्प्टन मैदानाचा व्हिडिओ दाखवत आहे. ब्रेव्हिस आता या लीगमध्येही त्याच्या आयपीएल कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून सहा सामने खेळण्याची संधी मिळाली. यावेली डेवॉल्ड ब्रेव्हिसने 37.50 च्या सरासरीने आणि 180 च्या स्ट्राईक रेटने 225 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
डेवॉल्ड ब्रेव्हिस मागच्या पर्वात म्हणजेच आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. पण त्यावेळी फक्त 3 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. यात त्याने फक्त 69 धावा केल्या होत्या. त्यामुळे हवी तशी छाप न पडल्याने मुंबई इंडियन्सने त्याला मेगा लिलावापूर्वी रिलीज केलं. पण त्याला संघात घेण्यात कोणत्याही फ्रेंचायझीने रूची दाखवली नाही. आयपीएल 2022 स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना ब्रेव्हिसने 7 सामन्यात 23 च्या सरासरीने 161 धावा केल्या होत्या.
