AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन संघ भिडणार! माजी क्रिकेटपटूने वर्तवलं असं भाकीत

आयपीएल 2025 स्पर्धेतील प्लेऑफमधील चार संघ ठरले आहेत. आता या चार संघांपैकी एका संघाकडे जेतेपद असेल यात काही शंका नाही. पण अंतिम फेरीत कोणते संघ भिडणार याबाबत आतापासूनच भाकीत वर्तवलं जात आहे. माजी क्रिकेटपटून रॉबिन उथप्पा याने याबाबत भविष्यवाणी केली आहे.

IPL 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हे दोन संघ भिडणार! माजी क्रिकेटपटूने वर्तवलं असं भाकीत
आयपीएल 2025 ट्रॉफीImage Credit source: Pankaj Nangia/Getty Images
| Updated on: May 27, 2025 | 4:12 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. पण या सामन्याचा प्लेऑफमध्ये पात्र संघांवर काहीच परिणाम होणार नाही. पण टॉप 2 गणित तेवढं काय ते सुटणार आहे. पण हे गणितच खूप महत्त्वाचं आहे. कारण टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना क्वॉलिफायर 1 सामना जिंकताच थेट फायनलला खेळण्याची संधी मिळते. तसेच पराभव झाला तरी क्वॉलिफाय 2 मधून अंतिम फेरीची आणखी एक संधी मिळते. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहणं किती महत्त्वाचं आहे यावरून कळतं. पंजाब किंग्सने टॉप 2 मध्ये जागा मिळवली आहे. तर मुंबई इंडियन्स एलिमिनेटर सामना खेळणार हे पक्कं झालं आहे. म्हणजेच आता गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातच टॉप 2 मधील एका जागेसाठी चुरस आहे. आरसीबीने लखनौविरुद्धचा सामना जिंकला तर टॉप 2 मध्ये जाईल. पण गमावला तर मुंबई इंडियन्स विरुद्ध एलिमिनेटर फेरीत खेळावं लागेल. असं असताना अंतिम फेरीतील दोन संघांबाबत माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने भाकीत वर्तवलं आहे.

रॉबिन उथप्पाने जियोस्टारशी बोलताना सांगितलं की, ‘पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरी करत प्लेऑफमध्ये जागा मिळवली आहे. पंजाब किंग्सची फलंदाजी खूपच जबरदस्त आहे. अर्शदीप सिंग चांगली गोलंदाजी करत आहे. यामुळे थेट संकेत मिळतात की मोठ्या सामन्यात तो चांगली कामगिरी करेल. मला पूर्ण विश्वास आहे की, आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आरसीबी आणि पंजाब किंग्स हे संघ भिडतील.’ त्यामुळे लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना जिंकणं आरसीबीसाठी खूपच महत्त्वाचं आहे. कारण तसं झालं तर हे दोन संघ अंतिम फेरीसाठी थेट आणि दोन संधी उपलब्ध असतील. जर हे दोन संघ अंतिम फेरीत आले तर आयपीएल इतिहासात नवा विजेता मिळेल. कारण या दोन्ही संघांनी जेतेपद मिळवलेलं नाही.

आरसीबी फ्रेंचायझीचं कौतुक करताना रॉबिन उथप्पाने सांगितलं की, ‘जोश हेझलवूड परत आल्याने मी खूप खूश आहे. त्याच्या येण्याने संघ खूपच मजबूत होईल. हेझलवूडने गोलंदाजीचा सराव सुरु केला आहे. तर विराट कोहलीला चेस मास्टरची भूमिका बजवावी लागणार आहे. त्याला 20 षटकापर्यंत फलंदाजी करणं आवश्यक आहे. जर त्याने तसं केलं तर समोरचा संघ दबावात येईल.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...