RCB vs LSG : प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी, दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला राग

आयपीएल 2026 स्पर्धेतील 23वा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये झाला. या सामन्यात आरसीबीने लखनौला पराभवाची धूळ चारली. या सामन्यानंतर आरसीबीच्या एका खेळाडूला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्यावरून आता वादाला फोडणी मिळाली.

RCB vs LSG : प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी, दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला राग
RCB vs LSG : प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी, दिग्गज क्रिकेटपटूने व्यक्त केला राग
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 16, 2026 | 4:06 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 23व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. लखनौ सुपर जायंट्सला 20 षटकात 146 धावांवर रोखलं. हे आव्हान आरसीबीने 15.1 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. 29 चेंडू राखून हा विजय मिळवल्याने आरसीबीच्या नेट रनरेटमध्ये जबरदस्त सुधारणा झाली आहे. त्यामुळे आरसीबीने गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. असं असताना आरसीबीला मिळालेल्या प्लेयर ऑफ मॅच पुरस्कारावरून वादाला फोडणी मिळाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने या पुरस्कारावरून राग व्यक्त केला आहे. विजयात ज्या खेळाडूने योगदान दिलं त्याला डावलल्याने आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

काय म्हणाला आकाश चोप्रा?

लखनौ सुपर जायंट्स विरूद्धच्या सामन्यात विशेष कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार हा जोश हेझलवू़डला देण्यात आला. त्याने या सामन्यात फक्त 1 विकेट घेतली होती. 4 षटकात 20 धावा देत निकोलस पूरनला बाद केलं होतं. तर रासिख सलाम दारने गोलंदाजीत त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी केली. त्याने 4 षटकात 24 धावा देत 4 गडी बाद केले होते. त्यामुळे आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केला आहे. रासिख सलाम दारला सामनावीराचा पुरस्कार का मिळाला नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच हा अन्याय असल्याचा भावना व्यक्त केल्या आहेत.

आकाश चोप्राने या प्रश्नाला तोंड फोडल्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

रासिख सलाम दारने एडन मार्करम, आयुष बडोनी, मुकुल चौधरी हे महत्त्वाचे तीन विकेट काढले. तर शेवटी आवेश खानला बाद केलं. त्यामुळे गोलंदाजी हेझलवूडपेक्षा राखिकची कामगिरी चांगली होती. इतकंच काय तर निर्धाव चेंडूतही हेझलवूडची बरोबरी साधली आहे. या दोघांनी 13-13 चेंडू निर्धाव टाकले. पण रासिखला डावलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Follow Us