AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RCB vs LSG: विराट कोहलीचं अर्धशतक आणि विक्रम दोन्ही हुकलं, पण ऑरेंज कॅप मिळवली

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकलं. इतकंच काय तर विक्रमासाठी त्याला आणखी एका सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. चला जाणून घेऊयात काय झालं ते

RCB vs LSG: विराट कोहलीचं अर्धशतक आणि विक्रम दोन्ही हुकलं, पण ऑरेंज कॅप मिळवली
RCB vs LSG: विराट कोहलीचं अर्धशतक आणि विक्रम दोन्ही हुकलं, पण ऑरेंज कॅप मिळवली
| Updated on: Apr 15, 2026 | 10:39 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी जबरदस्त झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात फक्त एकच सामना गमावला आहे. त्यामुळे गुणतालिकेत आरसीबीचा संघ मजबूत स्थितीत आहे. पाचव्या सामन्या आरसीबीचा सामना लखनौ सुपर जायंट्सशी झाला. या सामनयात आरसीबीने लखनौ सुपर जायंट्सला 146 धावांवर रोखलं. त्यामुळे या धावांचा पाठलाग करणं सोपं असल्याच स्पष्ट झालं. पण फिलीप सॉल्टच्या रूपाने पहिला धक्का बसला. फिलीप सॉल्ट 8 चेंडूत 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर देवदत्त पडिक्कलही 10 धावा करून तंबूत परतला. त्यामुळे विराट कोहलीने सावध खेळी करण्यास सुरूवात केली. विराट कोहलीने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याने 34 चेंडूत 49 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्याचं अर्धशतक फक्त एका धावेने हुकलं. पण ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.

ऑरेंज कॅप विराट कोहलीकडे

विराट कोहली 49 धावांवर असताना आवेश खानच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला. निकोलस पूरनने त्याचा झेल पकडला आणि तंबूचा रस्ता दाखवला. पण विराट कोहलीने तिथपर्यंत ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर घातली होती. विराट कोहलीने 49 धावांची खेळी केली आणि सनरायझर्स हैदराबादच्या हेनरिक क्लासेनच्या पुढे गेला. हेनरिक क्लासेनने 5 सान्यात दोन अर्धशतकांच्या मदतीने 224 धावा केल्या होत्या. आता विराट कोहलीने 2 अर्धशतकांच्या मदतीने पाच सामन्यात 228 धावा केल्या आहे. त्यामुळे ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. आता पुढच्या सामन्यात ही कॅप कोण खेचून घेतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

एक विक्रम हुकला

आयपीएल स्पर्धेत 300 षटकारांचा विक्रम थोडक्यासाठी हुकला. या सामन्यात 2 षटकार मारताच विराट कोहलीचं षटकारांचं त्रिशतक पूर्ण झालं असतं. पण विराट कोहलीने एकच षटकार मारला. आता त्याला हा विक्रमासाठी पुढच्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. 300 षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि रोहित शर्माच्या नावावर आहे. ख्रिस गेलने 141 डावात 357 षटकार, तर रोहित शर्माने 271 डावात 310 षटकार मारले आहेत. आता आरसीबीचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या सामन्यात एक षटकार मारताच विराट कोहली या यादीत सहभागी होईल.

Follow Us
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली….

मराठी अभिनेत्रीचा CJP आंदोलनाला विरोध, थेट विरोधी पोस्ट करत म्हणाली…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?