AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप 2025 जेतेपद कोणाला मिळणार? स्पर्धेआधीच भविष्यवाणी, अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती…

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पण या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीत विजेत्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने हे भाकीत वर्तवलं आहे.

आशिया कप 2025 जेतेपद कोणाला मिळणार? स्पर्धेआधीच भविष्यवाणी, अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती...
आशिया कप 2025 जेतेपद कोणाला मिळणार? स्पर्धेआधीच भविष्यवाणी, अभिषेक शर्मा आणि वरूण चक्रवर्ती...Image Credit source: Surjeet Yadav/MB Media/Getty Images
| Updated on: Sep 07, 2025 | 6:15 PM
Share

आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदासाठी एकूण आठ संघ शर्यतीत आहे. त्यापैकी भारताला या स्पर्धेत जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे. पण तरीही मैदानात कधी काही मोठा उलटफेर होईल सांगता येत नाही. आतापर्यंत अनेक उलटफेर क्रीडाप्रेमींनी पाहीले आहेत. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा आशिया कप स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये आहे. आशिया कप स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी 4-4 संघांचे दोन गट पाडले आहेत. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, ओमान आणि हाँगकाँग हे संघ या स्पर्धेत भाग घेणार आहेत. पण असं असलं तर सध्या फॉर्मात असलेला संघ जेतेपदासाठी दावेदार मानला जातो. आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना 28 सप्टेंबरला होणार आहे. आता अंतिम फेरीत कोणते दोन संघ आमनेसामने येतील याची उत्सुकता आहे. भारत-पाकिस्तान किंवा भारत अफगाणिस्तान हे संघ आमनेसामने येण्याची शक्यता क्रीडाप्रेमी वर्तवत आहे. हाच अंदाज बांधून माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याने भाकीत वर्तवलं आहे.

आकाश चोप्राने आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी भारतीय संघाला पसंती दिली आहे. इतकंच काय तर कोण सर्वाधिक धावा करेल, विकेट काढेल आणि प्लेयर ऑफ द सीरीज ठरेल हे देखील सांगितलं आहे. अभिषेक शर्माच्या मते, अभिषेक शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करेल. तर वरुण चक्रवर्ती सर्वाधिक धावा करेल. हार्दिक पांड्या हा प्लेयर ऑफ द मॅचचा मानकरी ठरेल. पण भारताचा अंतिम फेरीत सामना अफगाणिस्तानशी होईल असं त्याने सांगितलं आहे. कारण अफगाणिस्तानने मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. भारताच्या गटात युएई, पाकिस्तान आणि ओमान हे संघ आहेत. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध होणार आहे. हा सामना 10 सप्टेंबरला होणार आहे. तर 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची उत्सुकता भारतीय क्रीडाप्रेमींना आहे. कारण पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भिडणार आहेत. तर 17 सप्टेंबरला भारत आणि ओमान हे संघ आमनेसामने येतील.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा