आशिया कप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनचं नशिब फुटकं! प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्यापूर्वीच असं काही घडलं..
आशिया कप स्पर्धेला आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना सूर्यकुमार यादव कोणत्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरेल याची उत्सुकता आहे. मात्र तत्पूर्वी संजू सॅमसनच्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नेमकं काय झालं ते जाणून घेऊयात

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ युएईत दाखल झाला आहे. 10 सप्टेंबरला भारताचा पहिला सामना युएईशी होणार आहे. त्यामुळे भारताने जोरदार सराव केला आहे. साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकून सुपर 4 फेरीत जागा मिळवण्याचा हेतू स्पष्ट आहे. त्यासाठी कसून सराव सुरु आहे. या स्पर्धेपूर्वी बहुतांश खेळाडू तीन महिन्यांचा ब्रेकवर होते. त्यामुळे देशांतर्गत लीग स्पर्धा खेळत होते. भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी 4 सप्टेंबर युएईत दाखल झाला आणि 5 सप्टेंबरपासून सराव सुरु केला. पहिल्या दिवशी सराव सुरळीत पार पडला. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबरला भारतीय गोटातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. आशिया कप स्पर्धेपूर्वी संजू सॅमसनच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण संजू सॅमसन फिटनेसच्या फेऱ्यात अडकला आहे. कारण सरावादरम्यान संजू सॅमसनला दुखापत होत असल्याचं दिसून आलं आहे. त्याला चालताना अडचण येत असल्याचं सांगितलं जात आहे.
रेवस्पोर्ट्सच्या मते, टीम इंडियाचे जवळपास सर्वच खेळाडू नेटमध्ये सराव करत होते. पण संजू सॅमसन या सरावापासून दूर होता. यावेळी तो बॅटिंग कोच सितांशु कोटकसह सराव करत होता. यावेळी संजू सॅमसनने कोटकसोबत चर्चा केली आणि थ्रो डाऊनसाठी गेला. तेव्हा संजू सॅमसन कोचपासून लांब जात होता. तेव्हा त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली असावी असं वाटत होतं. करणा तो लंगडत चालत होता. त्याला दुखापत होत असावी वाटत होतं. इतकंच काय कोटक यांनी थ्रो डाऊन सुरु केलं तेव्हा सॅमसन शॉट्स खेळताना अडखळत होता. त्याला काहीतरी दुखापत होत असावी असं दिसत होतं. त्यामुळे तो हवी तशी फलंदाजी करत नव्हता.
संजू सॅमसननने 10-12 थ्रो डाऊन खेळल्यानंतर थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संजू सॅमसनचा फिटनेसबाबत आता टीम इंडिया आणि चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. कारण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. तसेच त्याचा फॉर्म चांगला आहे. केरळ क्रिकेट लीगमध्ये त्याने 5 डावात 30 षटकार मारले आणि आक्रमक अंदाजात दिसला. पण आता दुखापतीच्या बातमीने त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत क्रीडाप्रेमींच्या मनात शंका आहे. पण पहिल्या सामन्यापूर्वी फिट होईल अशी आशाही क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत.
