AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर मैदानात पहिली ठिणगी, सरावावेळी भारतीय खेळाडूंनी केलं असं काही…

आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ जोरदार तयारी करत आहे. पण क्रीडाप्रेमींचं लक्ष भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.

Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर मैदानात पहिली ठिणगी, सरावावेळी भारतीय खेळाडूंनी केलं असं काही...
Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर मैदानात पहिली ठिणगी, सरावावेळी भारतीय खेळाडूंनी केलं असं काही...Image Credit source: PTI/BCCI
| Updated on: Sep 07, 2025 | 3:48 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. भारताचा पहिला सामना युएईविरुद्ध 10 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. मात्र यावेळी भारत पाकिस्तान सामन्याचं महत्त्व काही वेगळंच आहे. कारण पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघ मैदानात भिडणार आहेत. हा सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. यासाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. पाकिस्तानला मैदानात गाडण्यासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. पण या सामन्यापूर्वी दोन्ही मैदानात दिसले. आयसीसी अकादमी मैदानात सराव करताना दिसले. दोन्ही एकाच मैदानात होते. पण भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंचं तोंड देखील पाहिलं नाही. मैदानाच्या एका बाजूला भारतीय संघ सराव करत राहिला. तर दहशतवाद्यांना खतपाणी घालणारा पाकिस्तानी संघ दुसऱ्या बाजूला सराव करत होता. रिपोर्टनुसार, भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंच्या जवळ जाणं देखील पसंत केलं नाही.

रिपोर्टनुसार, आशिया कप स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंना भेटणं टाळलं. त्यामुळे हस्तांदोलन करण्याचा संबंधच आला नाही. पाकिस्तानी संघ जेव्हा दुबईच्या आयसीसी अकादमीत पोहोचला तेव्हा टीम इंडिया तिथे सराव करत होती. पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंना सराव करताना पाहिलं. त्यानंतर त्यांच्या सरावाची आखणी करण्यास गुंतून गेली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 सप्टेंबरला दुबईत खेळला जाणार आहे.

आशिया कप स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये होणार आहे. तसं पाहिलं या स्पर्धेत भारताचं पारडं जड दिसत आहे. या स्पर्धेतील टी20 फॉर्मेटमध्ये दोन्ही तीन वेळा आमनेसामने आले. यात भारताने दोन वेळा, तर पाकिस्तानने एक वेळा विजय मिळवला आहे. दरम्यान, पाकिस्तानी संघ ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीसाठी तयारी करत आहे. या मालिकेतील अंतिम सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. त्यामुळे कोण बाजी मारतो? याची उत्सुकता आहे. कारण या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानला 39 धावांनी पराभूत केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला 18 धावांनी पराभूत केलं.

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.