AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 मध्ये किंग कोहलीने कधी बॅटींगला यावं? AB डिव्हिलियर्स म्हणाला…

AB de Villiers on Virat Kohli : के.एल. राहुल आणि श्रेयश अय्यर दुखापतीतून सावरले आहेत पण वर्ल्ड कपपर्यंत ते फिट राहतात की नाही याबाबतही साशंकता आहे. अशातच यावर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ए बी डिव्हिलियर्स याने याबाबत आपलं मत मांडलं आहे. 

World Cup 2023 मध्ये किंग कोहलीने कधी बॅटींगला यावं? AB डिव्हिलियर्स म्हणाला...
रोहित शर्माने एका वर्षात सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि ए बी डिव्हीलियर्स यांचा विक्रम ए बी डिव्हीलियर्स याआधी 2015 मध्ये सर्वाधिक ५८ सिक्सर मारले होते. या यादीत ए बी नंबर वन होता, आता रोहितने टॉप मारला आहे..
| Updated on: Aug 26, 2023 | 4:27 PM
Share

मुंबई : यंदाचा वन डे वर्ल्ड कप 2023  टीम इंडियासाठी महत्त्वाचा असून सर्व टीम मॅनेजमेंट वन डे सामन्यामध्ये संघात मोठे बदल करताना दिसत आहे. युवा खेळाडूंना संधी देत कायम डोकेदुखी ठरत असलेल्या चार नंबरसाठी कोणाला संधी द्यायची हे अजुनही काही निश्चित नाही. सूर्यकुमार यादव वन डे फॉरमॅटमध्ये चमकताना दिसत नाहीये. के.एल. राहुल आणि श्रेयश अय्यर दुखापतीतून सावरले आहेत पण वर्ल्ड कपपर्यंत ते फिट राहतात की नाही याबाबतही साशंकता आहे. अशातच यावर बोलताना दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ए बी डिव्हिलियर्स याने याबाबत आपलं मत मांडलं आहे.

काय म्हणाला AB डिव्हिलियर्स?

विराट कोहली याने चार नंबरला खेळायला यावं कारण तो योग्य प्रकारे डाव पुढे नेऊ शकतो. विराटला तीन नंबरला फलंदाजी करायला आवडते हे मला माहित आहे. मात्र त्याने वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत संघाच्या गरजेनुसार फलंदाजीला यायला हवं, असं ए बी डिव्हिलियर्स आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला.

विराट कोहलीला चेज मास्टर म्हणूनही ओळखलं जातं, लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने अनेक सामने एकहाती फिरवत संघाला विजय मिळवून दिले आहेत. विराट तीन नंबरलाचा फलंदाजासाठी उतरला आहे मात्र ओपनिंग खराब झाल्यावर मिडल ऑर्डर तितकी मजबूत नसल्याचं अनेक सामन्यात दिसून आलं.

दरम्यान, मिस्टर 360 म्हणजेच ए बी च्या मते विराटने चार नंबरला फलंदाजीसाठी उतरावं, त्यामुळे आता यावर विराट काही प्रतिक्रिया देतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आशिया कप 2023 साठी भारतीय संघ-:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Follow Us
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच....
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय.
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं
सिंधुदुर्गमधील ग्रामस्थांनी ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न उधळला, नेमकं.
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात
मोठी अपडेट! समता पतसंस्थेच्या संस्थापकांची चौकशी होणार... भोदू खरात.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद.
भयंकर घडलं! चार महिने सगळं नीट होतं नंतर हमीदनं... शिर्डीत लव्ह जिहाद..
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक...
तुम्ही खातायेत कृत्रीम आंबे, नवी मुंबईत एफडीएच्या कारवाईत धक्कादायक....
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल
भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंवर पैशांचा वर्षाव, व्हिडीओ व्हायरल.
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक..
डिझेल टंचाईचा फटका! हिंगोली-बीडमध्ये डिझेलसाठी झुंबड, हैराण वाहनधारक...
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती
माय पैनगंगा कोरडीठाक, पाण्याच्या थेंबासाठी पशूपक्ष्यांची भटकंती.
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ
धक्कादायक! नाशिकच्या आयटी कंपनी प्रकरणातील मोठी अपडेट, त्या गोड पदार्थ.