AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आई-वडील, नवरा बायको कोणासोबतच कधी तुमचं नातं खराब होणार नाही; फक्त चाणक्यांच्या या गोष्टी लक्ष ठेवा बस…

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य म्हणतात माणसाला आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडता आली पाहिजे, तीच त्याच्या यशस्वी जीवनाची पोहोच पावती असते. मात्र जबाबदारी पार पाडत असताना माणसाने नातेसंबंधांकडे देखील कधी दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, आयुष्यात माणसाला नातेसंबंध टिकवता आलेच पाहिजेत.

Chanakya Niti : आई-वडील, नवरा बायको कोणासोबतच कधी तुमचं नातं खराब होणार नाही; फक्त चाणक्यांच्या या गोष्टी लक्ष ठेवा बस...
chankya (Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 8:33 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसाच्या आयुष्यात पैशांचं प्रचंड महत्त्व असतं. तुम्ही पैशाने जगातील प्रत्येक गोष्ट खरेदी करू शकतात. त्यामुळेच माणूस आयुष्यभर पैशांमागे पळत असतो. आपल्याकडे खूप पैसा असावा यासाठी तो दिवस-रात्र मेहनत करतो. आपलं संपूर्ण आयुष्य पैसा कमावण्यात खर्च करतो. मात्र त्याच्या मृत्यूनंतर तो एकही पैसा सोबत घेऊन जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही पैसा कमावण्यामध्ये व्यस्त होतात, तेव्हा तुमचं तुमच्या नातेवाईकांकडे दुर्लक्ष होतं. तुम्ही तुमचे आई-वडील, बहीण आणि बायको, मुलगा अशा तुमच्यासाठी अत्यंत जवळच्या असलेल्या लोकांपासून देखील दुरावतात, याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर होत असतो, तुम्ही प्रचंड एकटं पडतात. त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात पैसा हा कमावलाच पाहिजे, परंतु पैसा कमावत असताना तुम्ही तुमचे नातेसंबंध देखील जपले पाहिजेत, तुम्ही तुमचा मित्र परिवार देखील वाढवला पाहिजे. कारण तुमच्या मृत्यूनंतर याचमुळे तुमची आठवण काढली जाते. जर तुम्ही आयुष्यभर फक्त पैसाच कमावत राहिलात तर हे जग तुम्हाला कधीही लक्षात ठेवणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

विश्वास – चाणक्य म्हणतात कोणत्याही नात्याची खरी ताकद ही विश्वासच असते. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवता तेव्हा तो व्यक्ती तुम्हाला आपोआप आपला वाटू लागतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या मनातील अशा काही गोष्टी ज्या तुम्ही आतापर्यंत कोणालाच सांगितलेल्या नाहीत त्या गोष्टी तुम्ही या व्यक्तीला सांगतात. तुम्ही तुमचं मन अशा व्यक्तीकडे मोकळं करतात, त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळते.

प्रेम – चाणक्य म्हणतात आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी नातं कोणतंही असू द्या, त्यामध्ये प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा हवा. तर आणि तरच तुमचं नातं टिकू शकतं. एखाद्या नात्यात जेव्हा प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा येतो, ते नातं कधीच खराब होऊ शकत नाही. असं नातं आयुष्यभर टिकतं. असं चाणक्य यानी म्हटलं आहे.

आदर – चाणक्य म्हणतात जशी नात्यामध्ये विश्वास आणि प्रेमाची गरज असते, तसाच नात्यामध्ये आदर देखील महत्त्वाचा असतो. जर तुम्ही समरोच्या व्यक्तीचा आदर कराल तर तो व्यक्ती देखील तुमचा आदर करतो, ज्या नात्यात आदर आहे, असं नातं आयुष्यात कधी खराब होत नाही. लक्षात ठेवा आयुष्य जगण्यासाठी जेवढा पैसा महत्त्वाचा आहे, तेवढेच महत्त्वाचे नातेवाईक देखील असतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता